दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून गळ्यावर सर्जिकलच्या ब्लेडने वार ! स्वत:च्या गळ्यावर देखील ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ – प्रेमसंबधावरून महिलेच्या गळ्यावर सर्जिकलच्या ब्लेडने वार करून नंतर स्वताःच्या गळ्यावर देखील ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकासमोर छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
निखील दादाराव यादव असे आरोपीचे नाव आहे. प्रथम माहिती अहवालानुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. त्यानंतर यातील आरोपी याने फिर्यादीचे दुस-या मुला सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून हॉटेल शांग्रीला येथील रुम मध्ये फिर्यादीस नेऊन तेथे फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या गळ्यावर सर्जिकलची ब्लेडने वार करून जखमी केले. तसेच स्वताःच्या गळ्यावर देखील ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून निखील दादाराव यादव यांच्यावर गुरन 106/2024 कलम 307, 309 नुसार क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोुपनि शेवाळे करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe