लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कॉन्ट्रक्टरवर तिघांचा चाकू हल्ला ! रोख रक्कम, आधार-पॅन कार्ड, दागिने हिसकावून भामटे पसार !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ – लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कॉन्ट्रक्टरवर तिघांनी हल्ला चढवला. रोख रक्कम, आधार-पॅन कार्ड, दागिने हिसकावून भामटे पसार झाले. ही घटना दि. १६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास धुळे सोलापूर रोडच्या ब्रिजपासून अंदाजे १०० मीटर अंतरावर लिंक रोडवर हॉटेल प्रभु जवळ घडली.
यासंदर्भात कॉन्ट्रक्टर रवि रमेश जाधव (रा. चिकलठाणा चौधरी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, यातील फिर्यादी हे लघुशंकेसाठी हॉटेल प्रभु जवळ गाडी उभी करुन थांबले असता तीन अनोळखी लोकं फिर्यादीजवळ आले आणि म्हणाले की, तू ईथे लघुशंका का करतो असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली.
शिवीगाळ करुन त्यापैकी एकाने चाकुने फिर्यादीच्या डावे हाताचे पंजाचे वर, अंगठ्यावर, उजव्या हाताचे दंडावर, डाव्या पायाचे गुडघ्याजवळ वार करून खिशातील पॉकेट रोख रक्कम 7000 हजार रुपये 500 रु दराचे 14 नोटा, आधार कार्ड पॅन कार्ड, सोन्याची अंगठी, चांदिचे ब्रासलेट, मोबाईल अशा वस्तु हिसकावून घेतल्या.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याप्रकरणी कॉन्ट्रक्टर रवि रमेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलिस स्टेशनमध्ये तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि सोनवणे करीत आहे.