क्राईमताज्या बातम्या
Trending

समर्थनगरमधील बगडिया हॉस्पिटलच्या बाजुचे मेडिकल फोडण्याचा प्रयत्न, दोन चोरट्यांना लोकांनी पकडले !

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ -: समर्थनगरमधील बगडिया हॉस्पिटलच्या बाजुचे मेडिकल फोडण्याचा प्रयत्न करणार्या दोन चोरट्यांना लोकांनी पकडले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्या दोघांना पोलिसांच्या हवाली केले. रोहित गोडा वय (22 वर्षे), बलवंत मुदगुलु (वय 24 वर्षे रा. मोंढानाका उड्‌डानपुलाच्या खाली छञपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

गोंविद मुरारीलाल आग्रवाल (वय 58 वर्षे, व्यवसाय-मेडिकल शॉप चालविणे रा. मधुमालती सोसायटी फ्लॅट नं.2 गुंटुरकर हॉपिटल समोर, छञपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहिती अहवालानुसार, समर्थनगर येथे बगडिया हॉस्पिटलच्या बाजुला ते व त्यांचे नातेवाईक सुनील श्रीकृष्ण सावा (रा. समर्थनगर) दोन्ही मिळून समर्थ मेडिकल चालवतात.

दिनांक 16/4/2024 रोजी रात्री 08.45 वाजेच्या सुमारास गोंविद आग्रवाल हे मेडिकलचे शेटर बंद करून घरी गेले. त्यानंतर जेवण करुन झोपलेले असताना दिनांक 17/4/2024 रोजी रात्री 00.15 वाजता नातेवाईक सुनील श्रीकृष्ण सावा यांनी फोन करून माहिती दिली की, आपले समर्थ मेडिकलचे शटर तुटलेले आहे. चोरीचा प्रयत्न झालेला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तेथे लॉकानी दोघांना धरुन ठेवले आहे असे कळवल्यावरुन गोंविद आग्रवाल हे ताबडतोब त्यांच्या समर्थ मडिकल येथे पोहोचले. मेडिकलचे डाव्या बाजुचे शेटर उचकटलेले दिसले व तेथे त्यांचे नातेवाईक सुनील सावा व लोकांना दोघांना पकडून ठेवलेले होते. त्यानंतर डायल 112 मोबाईलला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांकडून त्यांची नावे 1) रोहित गोडा वय 22 वर्षे 2) बलवंत मुदगुलु वय 24 वर्षे रा. मौढानाका उड्‌डानपुलाच्या खाली असे कळले.

याप्रकरणी गोंविद मुरारीलाल आग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित गोडा वय (22 वर्षे), बलवंत मुदगुलु (वय 24 वर्षे रा. मोंढानाका उड्‌डानपुलाच्या खाली छञपती संभाजीनगर) या दोघांवर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!