क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेष ज्ञानोबा कुटे व संचालक मंडळावर गुन्हा दाखल ! फिर्यादीची आई रुग्णालयात दाखल, तरीही रक्कम मिळेना !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ -: तब्बल 13% व्याजदराचे आमिष दाखवून पतसंस्थेत 8 एफ डी च्या रुपाने ठेवी ठेवल्या खर्या मात्र अडचणीच्या काळात ठेवीदारास रक्कम परत मिळत नाही. सदर ठेवीदाराने माजलगाव शहर पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली असून याप्रकरणी चेअरमन सुरेष ज्ञानोबा कुटे व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात रामेश्वर मनोहर लांडे (व्यवसाय शेती व व्यापार, रा. शिवाजीनगर माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांचे माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथे किराणा दुकान व शेती आहे. जुना मोंढा माजलगाव येथे असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा माजलगाव या सोसायटीचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे व इतर संचालक मंडळ यांची ही पतसंस्था असून सदरील पतसंस्थेतील तत्कालीन व्यवस्थापक हे फिर्यादी यांच्याकडे आले त्यांनी संस्थेबद्दल माहिती दिली व आमचे संस्थेमध्ये ठेवीवर 13% व्याजदर आहे असे सांगून इतर संस्थेपेक्षा जास्त व्याजदराचे आमिष दाखविले व म्हणाले की तुमच्या ठेवीवरील रक्कम तुम्हाला हवी त्यावेळेस आमची पतसंस्था परत देईल असे आश्वासन दिले.

जानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश जानोबा कुटे व इतर संचालक मंडळ यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी एकूण 3,80,000/- च्या 8 एफ डी काढल्या. फिर्यादीला दोन मुले असून दोघे लातूर या ठीकाणी निट परिक्षेची तयारी करीत आहेत. फिर्यादीला मुलांच्या शिक्षणास शैक्षणीक खर्च करण्याकरीता आर्थिक समस्याला सामोरे जावे लागत आहे. फिर्यादीच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान है ज्ञानराधाचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे होत आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

फिर्यादीची आई यांना उच्च रक्तदाब व मधुमेह आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासाठी फिर्यादीला पैशाची अत्यत आवश्यकता असल्याने फिर्यादी ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा माजलगाव मध्ये गेले असता पतसंस्थेचे अध्यक्ष चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे यांनी सदरील रक्कम परत करतो असे म्हणाले परंतु अ‌द्याप पर्यंत त्यांनी परत केली नाही. अध्यक्ष चेअरमन व संचालक मंडळाच्या चुकिच्या कार्यपद्धतीमुळे फिर्यादीस मानसिक व आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!