क्राईमताज्या बातम्या
Trending

वहिनीने डोळ्यात माती फेकली तर भावाने चेहऱ्यावर ब्लेडने वार केले ! अंतरजातीय विवाह केल्यावरून चिकलठाणा परिसरात राडा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ :- अंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून चिकलठाणा परिसरात राडा झाला. वहिनीने डोळ्यात माती फेकली तर भावाने चेहऱ्यावर ब्लेडने वार केल्याची फिर्याद भावाने भावाविरोधात दिली आहे. १७ मे रोजी रात्री २०.३० वाजेच्या सुमारास हिनानगर चिकलठाणा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

संजय विश्वनाथ भालेराव (वय ३०, रा. बजरंग नगर, चिकलठाणा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. रविंद्र विश्वनाथ भालेराव (वय ३५) व अन्य एका महिला अशी आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपी हा फिर्यादीचा सख्खा भाऊ असून, आरोपी क्र.2 ही फिर्यादिची वहिणी आहे. यातील फिर्यादिने अंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून फिर्यादिस त्यांच्या वहिणीने शिवीगाळ करून गाडीच्या बाहेर ओढले व फिर्यादिच्या डोळ्यात माती टाकली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यानंतर आरोपी क्र.1 याने फिर्यादिस लाकडी दांड्याने डाव्या हातावर मारून त्याच्या हातातील ब्लेडने फिर्यादिच्या चेह-याच्या डाव्या बाजुला व डाव्या हातावर ब्लेडने अनेक वार केले. यामुळे फिर्यादिची त्वचेला इजा पोहोचली व रक्तत्राव होवून फिर्यादी जखमी झाला. यानंतर आरोपी क्र.1 याने जिवंत मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी संजय विश्वनाथ भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र विश्वनाथ भालेराव व अन्य एका महिलेवर एम सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सफौ मुंढे करीत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!