तलाठी लाचेच्या सापळ्यात अडकला, स्वतः व साहेबासाठी मागितले चार हजार !
छत्रपती संभाजीनगर, दि. २०- शेत जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. याप्रकरणी तलाठ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण शामराव राठोड (वय-43 वर्षे, धंदा-नोकरी, पद-तलाठी, सज्जा आंदोरा, अतिरिक्त कार्यभार- सज्जा ईटकुर, तालुका कळंब जिल्हा-धाराशीव. रा. ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौक, आयटीआय कॅालेजच्या पाठीमागे, जिल्हा बीड.( वर्ग-3).) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी केलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून यातील आरोपी कल्याण शामराव राठोड वय 43 वर्षे याने दिनांक 14/05/2024 रोजी तक्रारदार यांचेकडे 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आलोसे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव, सापळा पथक – पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांनी पार पाडली.