परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेऱ्या मंजूर !
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ – परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेऱ्या मंजूर केल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –
1. नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या :
गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 22 एप्रिल ते 26 जून, 2024 दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 23.00 वाजता सुटेल आणि परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेऱ्या पूर्ण करेल.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
2. पनवेल – नांदेड द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या :
गाडी क्रमांक 07626 पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 23 एप्रिल ते 27 जून, 2024 दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 14.30 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल , रोटेगाव, लासुर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेऱ्या पूर्ण करेल.
या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील.