ताज्या बातम्यामराठवाडामहाराष्ट्र
Trending

उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायमूर्तींना गार्ड मार्फत हात धरून उठवल्यामुळे वकील संघ आक्रमक ! ज्यांच्यासाठी खुर्ची रिकामी केली त्या अधिकाऱ्यावर व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी !!

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात माननीय उच्च न्यायालय न्यायमूर्तींचा अवमान

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ -: छत्रपती संभाजी नगर येथे वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद, खंडपीठातील जेष्ठ न्यायमूर्तीचा प्रोटोकॉल न पाळून अवमान केल्याबद्दल चौकशी होऊन संबंधितावर कारवाईसाठी वकील संघ आक्रमक झाला आहे. ज्यांच्यासाठी खुर्ची रिकामी केली त्या अधिकाऱ्यावर व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वकील संघाने केली आहे.

यासंदर्भात उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, 2. सचिव, सांस्कृतिक व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, 3. सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, 4. सचिव, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार, दिनांक:- 02.02.2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदरील, कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजक यांनी रितसर माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्तीना आमंत्रित केले होते.

परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सायंकाळी 9:15 वाजेच्या सुमारास घटनात्मक पदावरील न्यायमूर्ती तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत घालून देण्यात आलेले प्रोटोकॉल हे संबंधित अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांनी न पाळता, त्यांच्याकडून पहिल्या रांगेतील आसनावर बसलेल्या, वरिष्ठ न्यायमूर्तीना एका गार्ड मार्फत हात धरून उठवून मागील रांगेत जाऊन बसण्यास भाग पाडले. तो प्रकार पाहून मागील रांगेत बसलेल्या न्यायमूर्तीनी सदरील न्यायमूर्ती वरिष्ठ असल्याबाबत सांगण्याचा प्रयत्न करूनही वरील घटना घडलेली आहे. त्या संदर्भात दिनांक:- 03.02.2024 रोजी अनेक वृत्तपत्रात बातमी छापून आलेली आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तरी, वरील घटनेचा उच्च न्यायालय वकील संघातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून, सदरील प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधित प्रोटोकॉल अधिकारी तसेच सुरक्षारक्षक व ज्यांना बसण्यासाठी वरील खुर्ची रिकामी करण्यात आली, त्या अधिकाऱ्यावर व इतर जबाबदार अधिकारी यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा उच्च न्यायालयातील वकील बांधव वरील प्रकरणाची दखल घेऊन तीव्र आंदोलन करतील याची गंभीर नोंद घेण्यात यावी. या निवेदनावर उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नर्ससंह एल. जाधव आणि सचिव अॅड. राधाकृष्ण के. इंगोले यांची स्वाक्षरी आहे.

बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्सचा ठराव, घटनेचा तीव्र निषेध

वेरुळ अजिंठा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमंत्रीत करण्यात आलेल्या मा. उच्च न्यायालयातील सन्माननीय न्यायमूर्तीना जागेवरून हात धरुन उठवून अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना काल दि. ०२.०२.२०२४ रोजी रात्री घडली असून सदर घटनेमुळे सन्माननीय न्यायमूर्तीचा अपमान झाल्याने बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्स, औरंगाबाद (छ. संभाजीनगर) कार्यकारणी सदरील घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात जाहिर निषेध व्यक्त करत आहे. अशा घटनेचा बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल लॉयर्स औरंगाबाद जाहिर निषेध करत आहे व दोषींविरुद्ध अत्यंत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करत आहे.

सूचकः अॅड. पराग शहाणे (सचिव), अनुमोदकः अॅड. प्रदीप ढवळे : ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या कार्यकारणी मिटींगला  अँड. प्रकाश एम. शिंदे (अध्यक्ष), अॅड. शैलेंद्र एस कुलकर्णी (उपाध्यक्ष), अॅड. पराग प्र. शहाणे (सचिव), अॅड, नितीन ढोबळे (सहसचिव), अॅड. बाबू शिंदे (काउंसिलर), अॅड. प्रदीप ढवळे, अॅड. मंजुषा अंबेकर, अॅड उदय खोंडे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!