ताज्या बातम्यामराठवाडा
Trending
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी ! 15 फेब्रुवारीपर्यंत सभा, मिरवणूक, मोर्चा काढण्यास परवानगी आवश्यक !!
जिल्ह्यात मनाई आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर, दि.2 :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 15 फेब्रुवारी पर्यंत अंमलात असतील.
या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना असतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe