वैजापूर तालुक्यातील महालगावचा गौतम वाल्मीक जाधव एमपीडीए कायद्यान्वये हर्सूल कारागृहात स्थानबद्ध !
एकूण 13 गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर, दि. १९- विरगाव हद्दीतील महालगाव येथील गौतम वाल्मीक जाधव यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. एकूण 13 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलीस अधीक्षकांची पुन्हा स्थानबध्दतेची कठोर कारवाई असून आतापर्यत एकूण 12 जणांना एम.पी.डी.ए. खाली स्थानबध्द करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वैजापूर तालुक्यातील पोलीस ठाणे विरगाव हद्दीतील गौतम वाल्मीक जाधव (वय 27 वर्ष रा. महालगाव तथा माळीसागज ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरुध्द पोलीस ठाणे विरगाव येथे सन 2020 ते 2024 पर्यंत सातत्याने गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्यावर उपविभागीय कार्यालय वैजापूर येथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुध्दा त्याने त्याचे गुन्हा करण्याचे सतत्य चढत्याक्रमाने चालू ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्याच्यावर पोलीस ठाणे विरगाव येथे 1) कलम 307 भादवि 2) कलम 294,336,452,427 भादवि 3) कलम 384,326,143,147 भादवि 4) कलम 143,341 भादवि 5) कलम 4/25 अार्म अॅक्ट तसेच दारुबंदी कायद्यान्वये (4) गुन्हे तसेच पो.स्टे. वैजापूर येथे दारुबंदी कायदयान्वये (1) व जुगार कायदयान्वये (1) गुन्हा आणि पो.स्टे. शिल्लेगाव अंतर्गत दारुबंदी कायदयान्वये (1) गुन्हा दाखल आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
या प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर कलम 93 महा. प्रो, का. अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून परत गुन्हे करण्याचे थांबवले नाही. त्याचेवर खूनाचा प्रयत्न, खंडणी बसुल करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून दुखापत करणे, शस्त्रांचा धाक दाखवणे, अवैधरित्या दारुविक्री करणे व जुगार खळणे असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. तो बेकायदेशीर कृत्य करून जनतेमध्ये दहशतीचे वातावर निर्माण झाले होते. त्याची गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी त्याच्या विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्यावर काहीएक परिणाम झाला नव्हता.
त्यामुळे मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या सूचने प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व विरगाव पोलीसांनी त्याच्या विरुध्द एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई साठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
यावरुन दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दि. 12/04/2024 रोजी गौतम वाल्मीक जाधव वय 27 वर्ष रा. महालगाव तथा माळीसागज ता. वैजापूर यांच्या विरुध्द एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला आहे. त्यावरून त्यास दिनांक 18/05/2024 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामील करून मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग वैजापूर, सतिश वाघ, पोलीस निरीक्षक स्थागुशा, शंकर श्रीराम वाघमोड, सहा.पो.नि. विरगाव, पोउपनि दीपक औटे, पोना गणेश जाधव, पोकों रावते, पोकों अभंग, पोकों शिंदे व पोना दीपक सुरवसे स्थागुशा यांनी केली आहे.