मामाच्या गावी होत असलेले 2 बालविवाह पोलिसांच्या सजगतेने थांबवण्यात यश, शिल्लेगाव हद्दीत एकाच आठवड्यातील सलग तिसरा बालविवाह रोखला !
छत्रपती संभाजीनगर, दि. २०- मामाच्या गावी होत असलेले 2 बालविवाह पोलिसांच्या सजगतेने थांबविण्यात यश आले. शिल्लेगाव हद्दीत एकाच आठवड्यातील सलग तिसरा बालविवाह दामिनी पथकातर्फे यशस्वीपणे थाबवण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील मुलींचे अल्पवयामध्ये होणाऱ्या लग्नांना प्रतिबंध घालण्यासाठी अशा चोरून होणाऱ्या बालविवाहाची गोपनीय माहिती काढून अशा विवाहांना थांबवून अल्पवयीन मुलींना विवाह बंधनात न अडकवता त्यांच्या इच्छेनुसार त्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पालकांचे समुपदेशनाद्वारे मत व मन परिवर्तन करून पालकांना कायदेशीर बाबींची माहिती देऊन अशा बालविवाहातून मुलींची वेळीच सुटका करण्याची सक्त सूचना दामिनी पथक व प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
दिनांक 18/02/2024 रोजी मा.महक स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, वैजापूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, म्हस्की , ता वैजापूर येथील एका अल्पवयीन मुलीचा तिच्या मामाच्या गावी सुलतानाबाद, ता गंगापूर येथे बालविवाह होणार आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यावरून स्वामी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे दामिनी पथकाचे सपोनि आरती जाधव यांनी तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. तेथे विवाह सोहळा संपन्न होणार असल्याबाबतची पूर्ण तयारी दिसून आली. यावरून दामिनी पथकाने तात्काळ मुलीच्या आई-वडिलांची भेट घेउन विश्वासात घेऊन अधिक चर्चा केली असता त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले. सदर मुलीचे वय तपासले असता तिचे वय 15 वर्ष 02 महिने असल्याचे निष्पन्न करून ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याचप्रमाणे दुसरा विवाह हा शहापूर घोडेगाव येथील 17 वर्षे 05 महिने वय असलेल्या मुलीचेही तिच्या मामा च्या गावी तांदूळवाडी शिवारताल मळ्यात विवाह होणार असल्याने शिल्लेगाव पोलिसांनी नमूद ठिकाणी बालविवाह होणार असल्याची खात्री केली. यावरून
दामिनी पथकाचे सपोनि आरती जाधव व चाईल्डलाईनचे समुपदेशक यशवंत इंगोले, निलेश दूर्वे यांनी नमूद ठिकाणी तातडीने धाव घेऊन तेथील मुलींच्या पालकांचे भेटी घेऊन त्यांना बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्याबाबत होणाऱ्या दुष्परिणामाबाबत व कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यामुळे आई वडील त्यांचे मन व मत परिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे. तसेच मुलगी ही सज्ञान झाल्यानंतरच तिच्या मर्जीनुसार तिचा विवाह करू असे आवर्जून सांगितले.
याबाबत चाइल्डलाईन तर्फे याबाबत बंधपत्र लिहून घेऊन सदर दोन्ही बालविवाहातील अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येऊन त्यांचे निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक यांनी अशाप्रकारे होणाऱ्या बाल विवाह रोखण्यात अग्रेसर व सक्त भूमिका घेऊन यापूर्वीसुद्धा अशा प्रकारे अल्पवयीन मुलीचे विवाह करणाऱ्या पालकांचे मन परिवर्तन करून अत्यंत सामंजस्याने बालविवाह रोखले आहे.
यावेळी मुलींच्या आई वडील व इतर नातेवाईक यांना बालविवाह संदर्भात कायदेशीर बाबीचे माहिती देऊन मुलीचे अल्पवयास लग्न करणे हा कायदेशीर रित्या गुन्हा असून अशी जाणीव पूर्वक बालविवाह ठरविण्यास किंवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पार पाडणाऱ्या दोन वर्षे सक्त मजुरी व दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार होऊ शकते. यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांचे लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण देण्यास प्रवृत्त करावे, ज्यामुळे भविष्यात मुली स्वतःचे पायावर उभे राहू तिचे स्वतःचे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल.
ही कारवाई मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक, महक स्वामी , SDPO वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे स पो नि आरती जाधव पो. ना. कपिल बनकर, पोअं इर्षाद पठान म.पो.अ जयश्री महालकर व चाइल्डलाईनचे समुपदेक यशवंत इंगोले आणि निलेश दूर्वे तसेच शिल्लेगाव पो. स्टे. चे स फौ आपसनवाड यांनी केली आहे.