ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

वरंगल आदिलाबाद वरंगल विशेष गाडीच्या दोन फेऱ्या !

नांदेड, दि. २०- प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने वरंगल-आदिलाबाद-वरंगल विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चलविण्याचे ठरविले आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1. गाडी क्रमांक 07023 वरंगल-आदिलाबाद विशेष गाडी – ही गाडी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी 16.00 वाजता वरंगल रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि काजीपेट, करीमनगर, निजामबाद, बासर, धर्माबाद, उमरी, मुदखेड, भोकर, हदगाव रोड, हिमायतनगर, सहस्त्रकुंड,धानोरा, किनवट, अंबारी मार्गे आदिलाबाद येथे गुरुवारी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 07024 वरंगल-आदिलाबाद विशेष गाडी: ही गाडी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी गुरुवारी रात्री 23.30 वाजता आदिलाबाद येथून सुटेल आणि आलेल्या मार्गानेच वरंगल येथे शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता पोहोचेल.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

3. या गाडीत एकूण 22 डब्बे असतील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!