ताज्या बातम्याराजकारण
Trending

शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन, राष्ट्रवादीचा दावा !

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाने इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्याचे नमूद करत शिवसेनेने (एकनाथ शिंदे) लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ चे उल्लंघन केल्याचे मान्य केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार यांच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगाचे पत्र पक्षाला प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, राज्य निवडणूक आयोगाने इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्याचे नमूद करत शिवसेनेने (एकनाथ शिंदे) लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ चे उल्लंघन केल्याचे मान्य केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे शिवसेनेला (एकनाथ शिंदे) त्यांच्या यादीतील नेते हे त्यांच्याच पक्षाचे सदस्य असल्याचे प्रमाणित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यात अनेक भाजप नेत्यांची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांची देखील नावे आहेत.

तसेच, भारतीय जनता पक्षाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ७७ अंतर्गत स्टार प्रचारकांची कोणतीही यादी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही अशी नोंद आहे, परिणामी त्यांना किमान पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी प्रवास खर्चाच्या सवलतीस नकार दिला गेला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

आमच्याकडून सजगतेने करण्यात आलेल्या तक्रारीचे कौतुक केल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखल्याबद्दल निवडणूक आयोगाचे मनःपूर्वक आभारही राष्ट्रवादीने मानले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!