ताज्या बातम्यामराठवाडाराजकारण
Trending

परभणी लोकसभा मतदार संघासाठी 11 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल, आजपर्यंत 98 उमेदवारांना 130 नामनिर्देशन अर्जाचे वितरण !

छत्रपती संभाजीनगर, दि. ३-: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज 11 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकूण 19 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले आहे. तर आज 13 उमेदवारांना 16 नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 98 इच्छुक उमेदवारांना 130 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिली आहे.

17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी आज दि. 03 एप्रिल रोजी बोबडे सखाराम ग्यानबा (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), विष्णुदास शिवाजी भोसले (अपक्ष), विनोद छगनराव अंभोरे (बहुजन मुक्ति पार्टी), किशोर राधाकिशन ढगे (स्वाभीमानी पक्ष), गणपत देवराव भिसे (अपक्ष), शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत), संगीता व्यंकटराव गिरी (स्वराज्य शक्ती सेना), विठ्ठल भुजंगराव तळेकर (अपक्ष), कांबळे शिवाजी देवजी (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.

तर कृष्णा त्रिंबकराव पवार यांनी (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी) आणि (अपक्ष) याप्रमाणे दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

उमेदवारांना गुरुवार, दि.4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी लागणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!