मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावण्याचे आदेश ! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये नोंदीचा नमूना अर्ज उपलब्ध !!
छत्रपती संभाजीनगर दि. 19 -: न्या. शिंदे समितीच्या निर्देशानुसार ज्या गावांमध्ये मराठा-कुणबी,कुणबी-मराठा नोंदी विविध कागदपत्राच्या आधारे सापडल्या आहेत. त्या नोंदी संबंधीत गावातील ग्रामपंचायतीमध्ये यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच पात्र नागरिकांना मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरण करणाचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी सर्व तहसीलदार यांना दिले.
दूरदृष्य प्रणालीद्वारे यासंदर्भात आज तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री, गंगापूर वैजापूर, छत्रपती संभाजी नगर, सिल्लोड- सोयगाव व सर्व तहसीलदार उपस्थित होते. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीच्या आधारे नागरिकांसाठी अर्ज नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्यानुसार प्रमाणपत्र तहसीलदार यांनी वितरीत करावेत असे सांगितले.
मराठा कुणबी कुणबी मराठा नोंदी आणि त्यानुसार करण्यात आलेल्या याद्या या छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.Aurngabad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित तहसीलदारांनी ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या गावाच्या नावाची यादी अपलोड करावी. तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करून याबाबत जाणीव जागृती करण्याचे सूचित केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनआयसी संकेतस्थळावर कुणबी नोंदी या कॉलमच्या अंतर्गत जिल्हाभरातील सर्व सापडलेल्या कुणबी नोंदीची गावनिहाय, तालुकानिहाय, नोंद आणि संबंधित कागदपत्रे छत्रपती संभाजी नगर जिल्हधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
या नोंदीच्या आधारे अर्जदाराने प्रमाणपत्रासाठी आपल्या संबंधित तहसीलदाराकडे अर्ज सादर करावेत व प्रमाणपत्र हस्तगत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. कुणबी नोंदी सापडलेला त्याचबरोबर इतर नोंदी घेण्याचे काम करण्यासाठी प्रगणक आणि प्रशिक्षकाचे नेमणूक करण्यात आलेली आहे. यानुसार प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित तहसीलदारांनी आपल्या तहसील स्तरावर घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.