जालन्यातील कुरिअर कंपनीत सहा लाख ४३ हजारांचा अपहार ! ऍमेझॉन डिलेव्हरी ऑफिसमधील प्रकार !!
छत्रपती संभाजीनगर, दि. १९- जालन्यातील कुरिअर कंपनीत सहा लाख ४३ हजारांचा अपहार झाल्याची तक्रार कुरिअरच्या मालकाने दाखल केली आहे. या तक्रारीवरून तालुका जालना पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
दीपक बद्री साळवे असे आरोपीचे नाव आहे. सुमित सुधीरराव ठाकरे (वय 32 वर्षे व्यवसाय-खाजगी नौकरी, रा. छत्रपती संभाजी) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांचे शॉप नं. 2, प्लॉट नं. 17/18, यशोदिप नगर, आदित्य ट्रॅक्टर शोरुम जवळ, अंबड रोड जालना येथे एनटेक्स ट्रांसपोर्टेशन सर्विसेस प्रायवेट लिमिटेड कंपनीचे एमेझॉन डिलेव्हरी ऑफिस सुमारे पाच वर्षापासून आहे.
जालना येथील एमेझॉन कुरियर हे सुमित ठाकरे यांच्या अधिपत्याखाली येते. या कुरियरमध्ये कर्मचार्यांची संख्या पाच आहे. त्यापैकी एक प्रमुख दीपक बद्रि साळवे हे वितरित केलेल्या मालाचे पैश्याची देवाणघेवाण करित असतात.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
दि. 13/01/2024 रोजी कंपनीची वार्षिक तपासणी केली असता त्यावेळी स्लिपव्दारे एजंटकडे भरलेल्या पैश्याची स्लिप मिळून न आल्याने त्याची एकूण रक्कम 6,43,217/ ही रक्कम रेकॉर्डवर व सदर तिजोरीमध्ये मिळून आली नाही. सदर कर्मचा-याने पैशांचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सुमित सुधीरराव ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक बद्री साळवे यांच्यावर तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.