किल्ले रायगडावरून शरद पवारांनी फुंकले रणशिंग ! निवडणूक आयोगाने आपला परिचय लोकांमधून व्हावा यासाठी हे रणशिंग फुंकले, तुतारी ही एका संघर्षाची सुरुवात !!
किल्ले रायगड, दि. २४ –“आज निवडणूक आयोगाने आपला परिचय लोकांमधून व्हावा यासाठी हे रणशिंग फुंकलेलं आहे, ही तुतारी दिलेली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी केले.
एकजुटीची साद आभाळा, किल्ले रायगडावरी रंगला ‘तुतारी’ सोहळा…! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ‘तुतारी’ वाजवणारा माणूस’ या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ‘पक्ष चिन्ह अनावरण’ सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवप्रेमी कार्यकर्ते बंधू-भगिनींनो..!
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा आहे. देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटाने जवळपास अशक्य करून ठेवलं आहे. हातामध्ये असलेली सत्ता ही सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरण्याऐवजी राज्याराज्यांमध्ये व आणखी भागांमध्ये, भाषांमध्ये या सर्वांत अडचण माजवण्याच्या संबंधीची काळजी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे.
हा एक वैचारिक धोरणांचा संघर्ष आहे. ज्यावेळेला आपल्याला संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांचे आपण आजही स्मरण का करतो? तो सबंध कालखंडच तसा होता, परकियांच्या हातात सत्ता होती. सामान्य माणसांत आत्मविश्वास वाढवण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, संस्थाने झाले. पण त्यांची जी ओळख होती ती वेगळ्या पद्धतीने होती. शिवछत्रपतींचे राज्य हे सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. हे रयतेचे राज्य व हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेसाठी जनशक्ती उभी करण्याचे काम शिवछत्रपतींनी केले.