ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

डीपी रोडवरील अतिक्रमणावर जेसीबी चालवला ! जागा आमची आहे आम्हाला मोबदला द्या सातबारावर आमचं नाव आहे !!

डीपी रोडवरील अतिक्रमण निष्कासित

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ – डीपी रोडवरील दहा बाय दहा टपरी तथा कब्जा अतिक्रमण काढून टाकण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढून घेण्याची सूचना अगोदर देण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद न दिल्याने महापालिकेने जेसीबी चालवला. जागा आमची आहे आम्हाला मोबदला द्या सातबारावर आमचं नाव आहे, असा दावा अतिक्रमणधारकाने केला आहे.

महानगरपालिकेच्या हद्दीत आमखास येथील कर्करोग रुग्णालया पासून कमल तलावापासून वर जाणारा डीपी रोड पुढे हिमायत बाग परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मिर्झा मेहमूद बेग मिर्झा अश्रफ अली बेग यांनी या ठिकाणी महानगरपालिकेची कोणती परवानगी न घेता आठ दिवसांपूर्वी दहा बाय दहा या आकाराचे लोखंडी अँगल व पत्रे ची टपरी तयार केली. सदर टपरी पूर्ण रस्ता बाधित आहे.

या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे रस्त्याचे काम पण सुरू आहे. हा भाग हा खूप वाहतुकीचा आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा लहान-मोठे अपघात नेहमीच होत असतात. या रस्त्यामध्ये अडथळा कसा निर्माण करायचा म्हणून सबंधित अतिक्रमण धारकांनी टपरी टाकून ही जागा आमची आहे आम्हाला मोबदला द्या सातबारावर आमचं नाव आहे असा दावा केला.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

संबधित याबाबत न्यायालयात सुद्धा गेले होते परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिक्रमण पथकाने बेग यांच्याशी आठ दिवसांपूर्वी चर्चा करून त्यांना अतिक्रमण काढून घेणे बाबत सांगितले व तुमचा मोबदला किंवा इतर जे काही वाद आहे त्याबाबत तुम्ही प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार करा. संबंधितांनी तोंडी आश्वासन दिले का मी टपरी काढून घेतो.

या अनुषंगाने त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना वेळ देण्यात आला. परंतु त्यांनी याबाबत काही लेखी पत्र व्यवहार न करता तसेच टपरी चे अतिक्रमण न काढल्यामुळे आज सकाळी जेसीबीच्या साह्याने हे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उप आयुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,रवींद्र देसाई यांच्या पथकाने केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!