क्राईमताज्या बातम्या
Trending
जिलेबी देण्यास उशीर झाल्याने झाऱ्याने व मोठ्या दांडीच्या उलथण्याने धोपटून काढले !
छत्रपती संभाजीनगर, दि. २० – जिलेबी देण्यास उशीर झाल्याने झाऱ्याने व मोठ्या दांडीच्या उलथण्याने मारहाण केली. ही घटना १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गुरुकृपा फरसान मार्ट गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
सुनील शामराव धनेधर (वय ३२, रा. प्रयदर्शनी नगर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. धनेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप पाटील व अन्य चार ते पाच जणांवर जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये 133/2024 कलम 324,323,143,147,149, 504,427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
यातील फिर्यादी हे आरोपी यांच्या दुकानात जिलेबी घेण्यासाठी गेले असता जिलेबी देण्यास उशीर झाल्याच्या कारणाने फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला आरोपीतांनी संगणमत करून झाऱ्याने व मोठी दांडी असलेल्या उलतणीने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe