ताज्या बातम्यामराठवाडाराजकारण
Trending

हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटलांचा पत्ता कापला ! जाहीर केलेली उमेदवारी काढून घेण्याची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नामुष्की !!

मातोश्रीवरील सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही- अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ : हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी काढून घेण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर ओढवली आहे. जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी काढून घेण्यात आल्याने राजकीय गोटात चर्चा होत आहे. भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे काही जण खाजगीत बोलत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना हिंगोलीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमंत पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. एकाच घरातून दोघांना उमेदवारी नको म्हणून ही उमेदवारी काढून घेण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे.

मातोश्रीवरील सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही- अंबादास दानवे

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. दानवे म्हणाले की, शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील.., असेही दानवे म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!