ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

सावधान : ट्रिपल सीट बाइक चालवताय? १००० रुपये दंडाची पावती ! छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट कॅमेरे अलर्ट मोडवर !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ – सावधान… तुम्ही ट्रिपल सीट बाइक चालवताय? १००० रुपये दंडाची पावती तुम्हाला लगेच मिळेल. तसा एसएमएस तातडीने तुमच्या मोबाईलवरही येईल. छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट कॅमेरे अलर्ट मोडवर असून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखा आणि स्मार्ट सिटी यावर काम करत आहे.

टू व्हिलर गाडीवर २ पेक्षा जास्त लोक ड्राइविंग करत असल्यास स्मार्ट सिटीच्या कॅमेरेत टिपले जात आहेत आणि वाहनधारकास रू १००० दंडाची पावती थेट ऑनलाइन पाठवली जात आहे. यास्तव स्मार्ट सिटी व पोलिस विभागामार्फत शहरातील वाहन चालकाना वाहतूकीचे नियम पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉजिशन कॅमेरा बसवण्यात आले आहेत. या कॅमेरामुळे शहरात वाहतूक सुरक्षा ठेवण्यास मदत होत आहे. शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर लावलेले या ए आय संचालित कैमरेच्या द्वारे वाहतुक नियम तोडल्यावर जसे की सिग्नल तोडणे, स्टॉप लाईनच्या पुढे गाडी थांबवणे, विना हेलमेट टू व्हीलर चालवणे, टू व्हिलरवर २ पेक्षा जास्त स्वार असणे याची नोंद घेतली जाते.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ए आय (आई) च्या मदतीने महाराष्ट्र वाहतूक पोलिसाच्या सिस्टिम मध्ये चित्र पाठवले जातात आणि नंबर प्लेटच्या मदतीने वाहनधारकाला एसएमएस च्या माध्यमाने ऑनलाइन दंडाची पावती पाठवण्यात येते. जो पर्यंत दंडाची रक्कम भरली जात नाही तो पर्यंत त्या गाडीच्या नावावर ते चलन सिस्टीम मध्ये असतो, स्मार्ट सिटी इंटीग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर प्रकल्पाचे मुख्य फैज अली ह्याने माहिती दिली.
रू ५०० ते रु १००० पर्यंत प्रत्येक प्रकरणात ऑनलाइन चलन करण्यात येत आहे. यामुळे पोलिस विभाग आणि स्मार्ट सिटी मार्फत शहरातील वाहनचालकाना वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!