गारखेडा परिसरात आपत्कालीन भारनियमनाची शक्यता ! एन-४ येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त !!
३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रामधील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ : वाढत्या तापमानामुळे व त्यामुळे वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे गारखेडा परिसरातील काही वीजवाहिन्यांवर महावितरणला नाईलाजास्तव आपत्कालीन भारनियमन करावे लागू शकते. मात्र दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होणार असून वीजग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
एन-४ येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे त्यावरील ११ केव्ही गारखेडा वाहिनीचा भार ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रावर घेण्यात आलेला आहे. परंतु मागील ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेमुळे अचानक वीज मागणी वाढली आहे. त्यामुळे ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रामधील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत आहे. परिणामी काही वीजवाहिन्यांवर रात्री १० ते २ वाजेपर्यंत कुठल्याही वेळेस सुमारे २ तास आपत्कालीन भारनियमन होण्याची शक्यता आहे.
यात ११ केव्ही गजानननगर वाहिनीवरील सारंग हाउसिंग सोसायटी, नंदिग्राम नंदीग्राम सोसायटी, कडा कार्यालय, वेद मंत्रा, चैतन्य हाउसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, विशालनगर, अलंकार सोसायटी, त्रिमूर्ती चौक, शांतिनिकेतन कॉलनी, उत्तमनगर, भानुदासनगर, विष्णुनगर, अरिहंतनगर, मित्रनगर, ११ केव्ही सुहास कॉलनी वाहिनी व ११ केव्ही गारखेडा वाहिनीवरील यश मुथियान, नाथ प्रांगण, साहस सोसायटी, आदिनाथनगर, भांडार चौक, के पॉन्ड हॉस्पिटल, प्रेरणानगर, विजय चौक, स्वप्ननगरी,
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
माणिकनगर, हनुमाननगर, पुंडलिकनगर, हुसेन कॉलनी, छत्रपतीनगर, ११ केव्ही मुथा वाहिनीवरील मेहरनगर, गारखेडा गाव, उल्कानगरी, सहयोगनगर, हिरण्यनगर, हनुमाननगर, शास्त्रीनगर, भगवती कॉलनी, अशोकनगर, हेडगेवार हॉस्पिटल, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आदी भागांत वीजपुरवठा बाधित होऊ शकतो.
एन-४ उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर गुरुवारी बसविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व समस्या मार्गी लागतील. तरी सर्व ग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
आज काही भागांत वीज बंद
दरम्यान, पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामासाठी एन-४ उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या काही वसाहतींचा वीजपुरवठा गुरुवारी (१८ एप्रिल) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यात मालाणी डीटीसी, मायानगर, सिडको एन-२, एन-३, अजयदीप काम्प्लेक्स, मानसी हॉटेल, गुरुसाहनीनगर, तिरुपती पार्क, चौधरी डीटीसी, एन-४, पारिजातनगर, विवेकानंदनगर, विश्रांतीनगर, उच्च न्यायालय, गारखेडा परिसराचा समावेश आहे, असे महावितरणने कळवले आहे.