ताज्या बातम्यामराठवाडाराजकारण
Trending

अखेर संदिपान भुमरेंच्या गळ्यातच शिवसेनेच्या उमेदवारीची माळ ! छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची निवडणूक !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २० – गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेंस कायम असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीत कोणाला मिळणार या चर्चेवर आता पडदा पडला आहे. भाजपाने या जागेवर दावा केला होता. मात्र, ही जागा शिवसेनेची असल्याने अखेर शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून संदिपान भूमरे यांचे नाव जाहीर करण्यात आल्याचे पत्र शिवसेनेने आज जारी केलं.

संदिपान भूमरे हे पैठणचे विद्यमान आमदार तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली असल्याने प्रत्येक ठिकाणी उमेदवार काळजीपूर्वक दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एमआयएम या पक्षाचे आहेत.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून माजी खासदार चंद्रकांत खैरे, एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील व महायुती शिवसेनेकडून संदिपान भुमरे अशी ही लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!