कोलते टाकळीत चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारे पैठण तालुक्यातील तिघे जेरबंद ! सात दिवसांपूर्वीच आले होते जेलच्या बाहेर; अहमदनगर, बिडकीन, वडोदबाजार पोलिस ठाण्यात १३ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २० – वृध्द दांपत्याला मारहाण करून चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटणारी तिकडी 18 तासांच्या आत जेरबंद करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 1,63,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. 1) बंटी टाबर चव्हाण रा. मारोळा ता.पैठण 2) विशाल टाबर चव्हाण रा. साईनगर, चित्तेगाव, बिडकीन 3) सावरदा टाबर चव्हाण रा. साईनगर, चित्तेगाव, बिडकीन अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक 14/04/2024 रोजी पोलिस ठाणे वडोदबाजार हद्यीतील कोलते टाकळी, येथे रात्री 2:30 वाजेच्या सुमारास प्रभाकर तुकाराम कोलत वय 52 वर्षे व नंदाबाई कोलते हे दांपत्य त्यांच्या घरात झोपलेले असताना अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या घरात घसुन त्यांना चापट बुक्याने मारहाण केली. चाकुचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचे 1,08,000/- रुपये किंमतीचे सोण्याचे दागिने व रोख रक्कम 10,000/- रुपये चोरून पळून गेले. चोरटे घरापासून थोडे दूर अंतरावर जाताच वृध्द दांपत्याने आराडा ओरडा केल्याने शेजारी नागरिक जमा झाले. त्यांनी सदर घटनेबाबत पोलीस ठाणे वडोदबाजार येथील सपोनि सुनील इंगळे यांना चोरटे पळालेल्या दिशेबाबत माहिती दिली. सपोनि सुनील इंगळे व त्यांचे पथक हे रात्रगस्त कामी असल्याने त्यांनी लागलीच कोलते टाकळीच्या दिशेन धाव घेतली असता चोरटे हे रिधोरा गावाचे दिशेन असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक नागरिकांचे मदतीने रिधोरा परिसरातील शेताच्या परिसरात शोध घेताना त्यांना अंधारात झुडपात पळताना एक आरोपी दिसल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. परंतु त्याचे इतर साथीदार हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले होते. यावेळी त्याला त्याचे नाव गाव विचरता त्यांने त्याचे नाव बंटी टाबर चव्हाण रा. मारोळा ता.पैठण असे सांगितले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी इतर दोन फरार आरोपीतांचा शोध घेवून गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्याबाबत वडोदबाजार पोलिसांसह, स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले होते. यावरून स्था.गु.शा. चे पथक फरार दोन्ही आरोपीचा कसोशिने शोध घेत होते. दोन्ही आरोपी हे बिडकीन परिसरातील चित्तेगाव येथील साईनगर परिसरातील राहणारे असून ते गावात आले असून ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याबाबत पथकाला माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने चित्तेगाव परिसरात आरोपीतांचा शोध घेत असताना सावरदा टाबर चव्हाण याला चित्तेगाव परिसरातून तर विशाल टाबर चव्हाण याला पोलीस येत असल्याचा सुगावा लागल्याने तो राहत असलेल्या साईनगर येथील घराच्या परिसरातून मोटरसायकलवर बसून पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
गुन्हा घडल्यापासून 18 तासांमध्ये तिन्ही आरोपीतांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस करता यातील आरोपी बंटी टाबर चव्हाण यांने गुन्हयातील चोरी केलेले दागिने व रोख रक्कम ही तो पळत असतांनाच त्याच परिसरात लपवून ठेवल्याचे सांगून पोलिसांना सर्व मुद्देमाल काढुन दिला आहे. त्याच्या ताब्यातून संपूर्ण चोरी केलेला 1,08000/- रुपयांचे सोन्याचे दागिने व 10,000 रोख तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेले मोटरसायकल असा एकूण 1,63,000/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
यातील आरोपी नामे 1) बंटी टाबर चव्हाण रा. मारोळा ता.पैठण 2) विशाल टाबर चव्हाण रा. साईनगर, चित्तेगाव, बिडकीन 3) सावरदा टाबर चव्हाण रा. साईनगर, चित्तेगाव, बिडकीन यांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कस्टडीत आहेत. पुढील तपास वडोदबाजार पोलीस करित आहेत.
हे आरोपी नुकतेच दरोडयाच्या गुन्हयातून 07 दिवसांपूर्वी जामीनावर जेल बाहेर आलेले होते. तसेच त्यांच्यावर अहमदनगर, बिडकीन, वडोदबाजार या पोलीस ठाण्यात 13 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, पूजा नांगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष वाघ, पोनि स्थागुशा, सुनील इंगळे, सपोनि वडोदबाजार, भगतसिंग दुल्हत, पो.उप.नि. संभाजी खाडे, पो.उप.नि. पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, संजय घुगे, वाल्मिक निकम, दीपेश नागझरे, अशोक वाघ, राहुल गायकवाड, संजय तांदळे, अकुंश बागल, दत्तु मोरे, मुस्ताक पटेल, योगेश तरमळे यांनी केली.