ताज्या बातम्यामराठवाडा

रिक्षाच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धांचे मोठे हाल ! छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट बस खचाखच भरून धावल्या !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १०: बुधवारी पुकारलेल्या रिक्षा संपामुळे माझी स्मार्ट बस सेवा नागरिकांसाठी वरदान ठरली.
शहरात रिक्षा चालकांनी संपात भाग घेतल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे मोठे हाल झाले. दरम्यान, स्मार्ट सिटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या माझी स्मार्ट बसमुळे काहीजणांना दिलासा मिळाला. सर्व मार्गावर शहर बस भरभरून धावल्या.
आकडेवारीनुसार शहर बस मध्ये बुधवारी रोजच्या अपेक्षा दुप्पट प्रवाशी संख्या होती. दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी संप केला.

सकाळच्या शिफ्टमध्ये एकूण 11,944 किलोमीटरवर 514 फेऱ्या झाल्या आणि त्यात 35599 प्रवासी होते. दुपारपर्यंत Rs 1007109 रुपये येवढं एकूण उत्पन्न झालं होतं. दिवसभरात शहर बस सेवेत 75,000 प्रवाशी संख्या होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सरासरी दररोज शहर बस मध्ये 30,000 प्रवासी असतात. म्हणून बुधवारी ही संख्या दुप्पट पेक्षा जास्त होती, संजय सुपेकर , शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक यांनी ही माहिती दिली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण शहर बस विभाग रस्त्यावर बसेसचा व्यवस्थापन बघत होते. त्यामुळे वाढीव प्रवश्याना सुविधा देण्यासाठी मदत मिळाल्याचा दावा मनपाने केला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!