ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

कन्नड घाटातील वाहतूक बंद करून तलवाडा घाटातून सुरु केली आता तलवाडा घाटही खराब झाल्याने या पर्यायी मार्गाचा करा अवलंब !

छत्रपती संभाजीनगर, दि. १९- कन्नड घाटातील वाहतूक बंद करून तलवाडा घाटातून सुरु केली होती. मात्र, आता तलवाडा घाटही खराब झाल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशान्वये कन्नड घाटातून वाहतूक ही पूर्णतः बंद करण्यात येवून पर्यायी वाहतूक ही तलवाडा घाटातून चालु करण्यात आली होती. परंतु दैनंदिन जड वाहतुकीमुळे तलवाडा घाटातील संपूर्ण रस्ता हा खराब होवून वाहतुकीस धोकांदायक झाल्याने सदर तलवाडा घाटातील रस्त्याची दुरुस्ती संदर्भात उच्च न्यायालयाच्या परवानगीने जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयीन आदेश दिनांक 7/3/2024 अन्वये तलवाडा घाट हा संपूर्णतः जड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, ग्रामीण यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (व), 34 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारा नुसार दि.19/04/2024 रोजी 24.00 वाजेपासून सदर तलवाडा घाट पुढील आदेशा पर्यंत सर्व प्रकारच्या जड/हलकी वाहने वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तलवाडा घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर हाती घेण्यात आले असल्यामुळे या मार्गावर वाहनधास्कांची गैरसोय होवून वाहतुक कोंडी होवू नये या करिता वाहनधारकांनी पुढील प्रमाणे पर्यायी वाहतुक मार्गाचा वापर करावा.

छत्रपती संभाजीनगर कडून कन्नड व तलवाडा घाटातुन चाळीसगाव कडे जाणारी वाहतूक आता छत्रपती संभाजीनगर साजापूर लासूर गंगापूर चौफुली वैजापूर- येवला मनमाड चाळीसगाव धुळेकडे जातील.

छत्रपती संभाजीनगर कडून कन्नड व तलवाडा घाटातुन धुळे कडे जाणारी वाहतुक आता छत्रपती संभाजीनगर साजापूर (सोलापूर- धुळे मार्गाने) माळीवाडा समृद्धी महामार्गाने जांबरगाव पर्यंत तेथून खाली उतरून गंगापूर चौफूली वैजापूर- वैजापूर येवला मनमाड मार्गे धुळे कडे जातील.

छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव धुळे कडे जाणारी जड वाहतुक आता छत्रपती संभाजीनगर साजापूर कसाबखेडा फाटा- देवगाव रंगारी शिऊर वैजापूर मार्गे येवला- मनमाडा- चाळीसगाव मार्गे धुळे कडे जातील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!