ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल ! हे रस्ते वाहतुकीसाठी राहतील बंद, या पर्यायी मार्गाचा करा अवलंब !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ -:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून पर्यायी मार्ग वाहतूक पोलिसांनी सूचवले आहे. दि. १३ व १४ एप्रिल रोजी हा काही मार्गावर बदल करण्यात आला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त दिनांक १४/०४/२०२४ रोजी सालाबादप्रमाणे उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी ०६.०० वाजेपासून ते रात्री २४.०० वाजेपावेतो जातात. तसेच विविध ठिकाणी रॅली व मिरवणुका निघतात. त्यापैकी मुख्य मिरवणुक क्रांतीचौक येथून सुरु होवून पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, मुख्य पोस्ट ऑफीस मार्गे भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ विसर्जित होतात.

तसेच सिडको भागातही रॅली व मिरवणुका निघतात. वरील नमुद ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. तसेच जयंतीच्या एक दिवस अगोदर दिनांक १३/०४/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहरातून व परिसरातून मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. त्यामुळे भडकल गेट परिसरात व मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होवून, नागरिक व भाविकांच्या सुरक्षितेस, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून मिरवणुक मार्गावर व भडकल गेट परिसरात वाहतूकीचे विनियमन व नियमन करणे आवश्यक आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

दिनांक १३/०४/२०२४ रोजी सायंकाळी १८.०० ते २४.०० वाजे पर्यंत, खालील मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे.
१) मिलकॉर्नर ते सिटी क्लब
पर्यायी मार्ग-
१) जळगाव कडून येणारी वाहने ही हर्सूल टी- जळगाव टी- जालना रोड- अमरप्रित चौक- महाविर चौक (बाबा पेट्रोल पंप) मार्गे जातील
व येतील.
२) दिल्लीगेट कडून येणारी वाहने ही सिटी क्लब, महानगरपालिका कार्यालय, टाऊन हॉल उड्डाणपुलाखालुन- मकईगेट- बेगमपुरा-
विद्यापीठ मार्गे पुढे जातील.
३) दिल्लीगेट कडून येणारी वाहने ही सिटी क्लब, महानगरपालिका कार्यालय, मुलींचे आय. टी. आय, खडकेश्वर मार्गे पुढे जातील.
४) महावीर चौक व मध्यवर्ती बसस्थानक येथून येणारे वाहने मिलकॉर्नर, कार्तिकी चौक, महावीर चौक, सेशन कोर्ट, क्रांतीचौक,
आकाशवाणी, जळगाव टी मार्गे पुढे जातील व येतील.

दिनांक १४/०४/२०२४ चे सकाळी १०.०० पासून ते रात्री २४.०० वाजेपर्यंत खालील मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे.
१) महाविर चौक ( बाबा पेट्रोल पंप) ते अमरप्रित चौक.
२) गोपाल टी- क्रांती चौक- सिल्लेखाना- पैठणगेट- बाराभाई ताजिया – गुलमंडी- सुपारी हनुमान मंदिर- उत्तम मिठाई भंडार-
सिटीचौक – जुना बाजार – मुख्य पोस्ट ऑफीस भडकल गेट.
३) शहागंज – गांधीपुतळा- सराफा – सिटीचौक.
४) औरंगपुरा पोलीस चौकी ते बाराभाई ताजिया.
५) मिलकॉर्नर ते सिटी क्लब.
६) एन १२ नर्सरी – गोदावरी पब्लिक स्कूल- टि. व्ही. सेंटर – एन- ९ – अयोध्यानगर- शिवनेरी कॉलनी- एन-७ शॉपिंग सेंटर या मिरवणुक
मार्गावरील वाहतुक मिरवणुक सुरु असे पर्यंत एकेरी मार्गावरुन वळविण्यात येईल.

पर्यायी मार्ग :-
१) जळगाव कडून येणारी वाहने ही हर्सूल टी- जळगाव टी- जालना रोड- अमरप्रित चौक- दर्गा चौक- गोदावरी टी- महानुभव
आश्रम चौक- रेल्वेस्टेशन चौक – महाविर चौक (बाबा पेट्रोल पंप) मार्गे जातील व येतील.
२) जळगाव टी व जालनाकडून येणारी वाहने ही अमरप्रित चौक- दर्गा चौक- शहानुरवाडी, भाजीवाली बाई पुतळा, गाडे चौक,
देवगिरी कॉलेज, विट्स हॉटेल, कोकणवाडी किंवा रेल्वेस्टेशन चौक मार्गे पुढे जातील व येतील.
३) सतिष मोटार्स, सावरकर चौक, निरालाबाजार, औरंगपुरा या मार्गाने जातील.
४) चेलीपुरा, कामाक्षी लॉज, महानगरपालिका कार्यालय या मार्गाने जातील.
५) दिल्लीगेट कडून येणारी वाहने ही सिटी क्लब, महानगरपालिका कार्यालय, टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून- मकईगेट- बेगमपुरा-
विद्यापीठ मार्गे पुढे जातील.

बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील.
सदर अधिसूचना ही पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागु राहणार नाही.
या अधिसूचनेचा भंग करणारी व्यक्ती मो.वा.का.,म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असे पोलिसांनी कळवले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!