क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

संत एकनाथ साखर कारखान्यासमोरील पार्लर व हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापेमारी ! दोन्ही ठिकाणचे जुगार चालवणारे पळून गेले, जुगार खेळणारे लागले गळाला !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ – संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील जेन्टस् पार्लर व होटेलमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार ग्राहकांना पकडले. दोन्ही ठिकाणचे जुगार चालवणारे पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही ठिकाणाहून  १ लाख ३३ हजार ३६० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोहेकॉ विष्णु जगन्नाथ गायकवाड (नेमणुक विशेष पथक छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 11/04/2024 रोजी सपोनि सुदाम शिरसाठ, पोह कोल्हे, पोअ धापसे हे जिल्हा नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथून ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध धं‌द्याची माहिती काढून केसेस करण्यासाठी रवाना झाले. एम आय डी सी पोलिस ठाणे हद्‌दीमध्ये ईसारवाडी फाट्यावर असताना पोलिस पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर सैराट जेन्टस पार्लर नावाच्या दुकानामध्ये (शटरमध्ये) काही लोक ऑनलाईन चक्री नावाचा जुगाराचा खेळ पैशावर खेळत आहेत. ही खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा मारण्याची योजना आखली.

पंचासह पोलिस पथक सदर ठिकाणी 14.30 वाजता पोहोचले. तेथे आंनलाईन गेम चक्री जुगाराचा खेळ खेळताना दोन जण मिळून आले. व खेळणारे पळून गेले. सदर ठिकाणी मिळून आलेल्या दोघांना त्यांचे नाव गाव व जुगार चालवणाऱ्या मालकाचे नावगाव विचारता मिळून आलेल्या दोघांपैकी 1) गोकुळ रामनाथ उगलमुगले वय 30 वर्ष रा. ईसारवाडी ता. पैठण असे असल्याचे सांगितले 2) अरविंद बाळु वाहुळ वय 23 वर्ष रा. पेपरमिल स्टॉप कारखाना समोर ईसारवाडी ता पैठण असे असल्याचे सांगितले व मालकाचे नाव रवी सोनवणे रा. नांदर ता. पैठण असे असल्याचे सांगितले. पोलिसांना सदर ठिकाणाहून जुगाराचे साहित्य पंचनामा करून जमा करण्यात आले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ही कारवाई करुन पथक पोलिस स्टेशनकडे निघाले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर हॉटेल ओमसाई नावाच्या शटरमध्ये काही लोक ऑलाईन गेम चक्री नावाचा जुगाराचा खेळ पैशावर खेळत आहेत. ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारण्याची योजना आखली. मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी 14.55 वाजता छापा मारला असता तेथे ऑनलाईन गेम चक्री जुगाराचा खेळ खेळताना दोन जण मिळून आले व खेळणारे पळून गेले.

सदर ठिकाणी मिळून आलेल्या दोघांना त्यांचे नावगाव व जुगार चालवणार्या मालकाचे नावगाव विचारता मिळुन आलेल्या दोघांपैकी 1) अभिजीत नवनाथ सोनटक्के वय 20 वर्ष रा. सावता नगर पाथर्डी जि अह‌मदनगर असे सांगितले 2) शंकर विक्रम राठोड वय 21 वर्ष रा पाण्याच्या टाकीजवळ बालानगर ता पैठण असे असल्याचे सांगितले व मालकाचे नाव विकास नाचण रा. धनगाव ता पैठण असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआईडीसी पैठण पोलिस स्टेशनमध्ये ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!