क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

पिपळगाव पांढरीत ग्रामपंचायतच्या जागेत बेकायदेशीर पुतळा बसवल्याप्रकरणी करमाड पोलिसांत ७ जणांवर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ -: पिपळगाव पांढरी येथील मारोती मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बेकायदेशीर पुतळा बसवल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाड पोलिस पुढील तपास करीत आहे. सदरची जागा ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

शिवाजी बाबूराव पानगावकर (वय 47 वर्ष व्यवसाय-नौकरी ग्रामसेवक ग्रामपंचायत पिपळगाव पांढरी रा. सहार परिर्वतन कॉलनी सांवगी हर्सूल ता जि छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार ते जुलै 2023 पासून पिपळगाव पांढरी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.

दिनांक. 19/02/2024 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ग्रामसेवक शिवाजी पानगावकर हे घरी असताना पिपळगाव पांढरी येथून  फोनव्दारे माहिती मिळाली की, दिनांक 19/02/2024 च्या रात्री 02.00 ते 03.00 वाजेच्या दरम्यान अज्ञात लोकांनी पिपळगाव पांढरी येथील मारोती मंदिराचे समोरील मोकळ्या जागेत बसण्यासाठी असलेल्या जुन्या सिंमेटच्या ओट्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला आहे. ही माहिती मिळताच ग्रामसेवक शिवाजी पानगावकर यांनी घटनास्थळ गाठून पुतळ्याची पाहणी केली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

मारोती मंदिराच्या समोर पुतळ्यासाठी नियोजित असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सरकारी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंदाजे साडे पाच फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामसेवकांनी बेकायदेशीरत्या पुतळा बसवलेल्या अज्ञात लोकांचा शोध घेतला असता त्या दिवशी पुतळा बसवणार्यांची नावे समजू शकली नाहीत.

त्यानंतर गावातून गोपनिय माहिती मिळाली की दि 19/02/2024 रोजी गावातील सरकारी जागेत 1) उत्तम रामराव ठोंबरे (2) अनिल जालिंदर ठोंबरे 3) पांडुरंग विश्वनाथ ठोंबरे 4) पांडुरंग लक्ष्मण ठोंबरे 5) ज्ञानेश्वर रामराव ठोंबरे 6) आप्पासाहेब देवराव ठोंबरे 7) वेजीनाथ बाबुराव बोंबाळे (सर्व रा पिंपळगाव पांढरी ता जि छत्र संभाजीनगर) यांची नावे कळाली. सरकारी जागेत परवानगी न घेता, बेकायदेशी रित्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याची फिर्याद ग्रामसेवक शिवाजी पानगावकर यांनी दिली असून याप्रकरणी करमाड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!