क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देवून युवकाने पोलिस आयुक्तांच्या इनोव्हावर वीट भिरकावून काच फोडली !

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ – भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद घोषणा देवून युवकाने पोलिस आयुक्ताच्या इनोव्हावर वीट भिरकावून काच फोडली. पोलिस आयुक्त यांची पोर्चमध्ये उभी असलेली शासकीय पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारच्या ड्रायव्हरच्या विरुध्द बाजुच्या दरवाज्याच्या काचेवर वीट फेकून मारली. याशिवाय पोलिस आयुक्त कार्यालयाच्या काचेच्या प्रवेशव्दारावरही वीट फेकून मारली.

प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 22/02/2024 रोजी अंदाजे 18.00 ते 18.30 वाजे दरम्यान पोलिस आयुक्त कार्यालय मुख्य प्रवेशव्दाराची काच फुटल्याचा आवाज आल्याने पोलिसांनी तिकडे पाहीले असता प्रवेशव्दारा समोरील पायऱ्यांजवळ एक युवक मोठ्याने भूमाफीया मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत होता. त्याच्या पाठीला एक काळ्या पांढऱ्या केशरी रंगाची बॅग अडकवलेली होती.

त्याला पकडण्यासाठी पोलिस त्याच्याकडे धावले असता त्या दरम्यान त्याने त्याच्या कडील बॅगमधुन एक विटाचा तुकडा काढुन पोलिस आयुक्त यांची पोर्चमध्ये उभी असलेली शासकीय पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार च्या ड्रायव्हरच्या विरुध्द बाजुच्या दरवाज्याच्या काचेवर तेथूनच फेकून मारली व कारची काच सुध्दा फोडली. पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव विशाल श्रावण म्हस्के (वय-28 वर्षे, रा. स्वराज नगर, बाळापुर फाटा, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी काच फुटलेल्या प्रवेशव्दाराजवळ व पोलीस आयुक्त यांच्या कार जवळ पाहणी केली असता प्रवेशव्दाराजवळ अर्धी विट व कारजवळ अर्धी विट पडलेली दिसली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

याप्रकरणी विशाल श्रावण म्हस्के (वय-28 वर्षे, रा. स्वराज नगर, बाळापुर फाटा, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!