किल्ले रायगडावरून शरद पवार फुंकणार रणशिंग ! घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची, उद्या पक्ष चिन्ह अनावरण सोहळा !!
मुंबई, दि. २३- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह मिळालं. पक्ष चिन्ह अनावरण सोहळा उद्या, २४ रोजी किल्ले रायकडावर होणार आहे. किल्ले रायगडावरून शरद पवार रणशिंग फुंकणार आहे.
यासंदर्भात पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, “आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया!
सह्याद्रीच्या साथीने तुतारीचा नाद अखंड भारतात घुमणार. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांच्या एकजुटीने महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तावर मात करणार, असा दावा पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe