जालन्यात नवरदेवावर गोळीबार, बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या युवकावर राष्ट्रमाता कॉलेजजवळ चौघांचा हल्ला !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ -: तोंडावर लग्न येवून ठेपल्याने वधूसाठी दागिने व बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या नवरदेवावर गापठी कट्यातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली. ही गोळी चुकवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, चार हल्लेखोरांनी नवरदेवाला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना जालन्यातील राष्ट्रमाता कॉलेजजवळ घडली.
गौतम रावसाहेब जाधव (वय 25 वर्ष व्यवसाय ठेकेदार रा. शिवनगर सुंदर अपार्टमेन्टच्या पाठीमागे जालना) असे जखमी युवकाचे नाव आहे. पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक-23/01/24 रोजी सकाळी गौतम जाधव घरातून दागदागिने व कपड्याचा बस्ता बांधण्यासाठी सोनार गल्लीत मोटारसायकलने एक लाख रुपये घेवून जात होते. 10.00 वाजता राष्ट्रमाता कॉलेज समोर पोहोचले असता प्रेम बबन गायकवाड याने गौतम जाधव यांच्या दिशेने गावठी कट्याने एक गोळी फायर केली.
ती गोळी गौतम जाधव यांच्या बाजुने गेली. त्यानंतर गौतम जाधव गाडी सोडून पळून जात असताना प्रेम गायकवाड, भरत जाधव, गौरव जाधव, राजेंद्र पवार यांनी गौतम जाधव यांना आडविले व शिवीगाळ करुन प्रेम गायकवाड याने त्याच्या हातातील तलवारीने गौतम जाधव यांच्या डोक्यात मारली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यानंतर गौरव जाधव याने चाकुने गौतम जाधव यांच्या डोळ्याच्या बाजुला व कानावर वार केले. यानंतर गौतम जाधव हे तेथे खाली पडताच चौघांनी मारहाण केली व मोटारसायकलची तोडफोड करुन नुकसान केले. त्यानंतर जखमी गौतम जाधव यांना सामान्य रुग्णालयात औषधोपचार घेतला. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले.
याप्रकरणी जखमी गौतम जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रेम गायकवाड, भरत जाधव, गौरव जाधव, राजेंद्र पवार यांच्यावर कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.