आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळा अधिवेशनात गाजला ! १२ संचालक, व्यवस्थापक, ३ कर्मचारी, १४ व्यक्तिगत कर्जदार, संस्था कंपनी, १२ जमीनदार, २ सनदी लेखापालांवर गुन्हा, १५ जण अटकेत, दोघांना जामीन !!
नागपूर – छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला.
छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. त्यानंतर गुंतवणूकदारांना नोटीस आल्या आहेत. यावर कारवाईसाठी गतीने पावलं उचलण्याची आवश्यकता असताना ती उचलली जात नाही याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
तसेच गुंतवणूकदारांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांच्या तीव्र भावना उमटल्या आहेत. त्यामुळे सरकार व संबंधित विभाग त्यांना न्याय केव्हा देणार, असा प्रश्न आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. या पतसंस्थेच्या मालमत्तांचे मूल्य मोठया प्रमाणात निघालं आहे, तरी खातेधारकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आलं की, या पतसंस्थेत १८० कोटी रुपयांचा अफरातफर झाली आहे. लेखा परीक्षण अहवालात संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी अशा ५१ जणांवर १०३ कोटी १७ लाख रुपयांचा अपव्यवहारांचा गुन्हा दाखल केला आहे. यात १२ संचालक, १ व्यवस्थापक, ३ कर्मचारी, १४ व्यक्तिगत कर्जदार, संस्था कंपनी, १२ जमीनदार, २ सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. १५ लोकांना अटक व दोघांना जामीन मिळाला आहे.
हे पैसे वसूल करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. ती त्वरेने सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत. ८७६ कर्जदारांकडून २ प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहेत. १८ मालमत्ता २२ कोटी ८७ लाख लिलावद्वारे विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच खातेदारांना हे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.