क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

वैजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचयात विरगाव मुर्शदपूरमध्ये ६३ लाखांचा अपहार ! सरपंच व ग्रामसेवक असल्याचे भासवून बॅंकेतून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम केली वर्ग !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ – वैजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचयात विरगाव मुर्शदपूरमध्ये ६३ लाख ५७ हजारांचा अपहार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच व ग्रामसेवक असल्याचे भासवून बॅंकेतून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

1) भरत शिवाजी कदम (रा. विरगाव ता. वैजापूर), 2) महेश तुकाराम पवार (रा. नेवरगाव ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. दिनांक 27/12/2023 ते दिनांक 1/01/2024 या कालावधीमध्ये व मौजे विरगाव (ता. वैजापूर) येथे यातील आरोपी यांनी ते सरपंच व ग्रामसेवक नसतांना ते सरपंच व ग्रामसेवक असल्याचे भासवून तसे खोटे कागदपत्र व पुरावे तयार करण्यात आली.

या खोटे कागदपत्र व पुराव्यावरून ग्रुप ग्रामपंचयात विरगाव मुर्शदपूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वैजापूर शाखेतून एकूण 63,57,236 रुपये रक्कम वेगवेगळ्या खात्यावर वर्ग करून त्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

याप्रकरणी ग्रामसेवक (ग्रुप ग्रामपंचायत विरगाव मुर्शदपूर ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन-गुरन 39/24 कलम 420, 465,467,34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि एस. एस. वाघमोडे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!