क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

वैजापूरमधून दुचाकी चोरी करणारे दोघे गजाआड; कारखाना चौफुली, बोरसरमधून १४ दुचाकी जप्त ! मंगल कार्यालय, पंचायत समिती आणि कोर्ट परिसरातूनच करायचे चोरी !!

Story Highlights
  • वैजापूर परिसरातील साई लॉन्स, सुभद्रा लॉन्स, द्रौपती लॉन्स, पंचायत समिती, धुमाळ मंगल कार्यालय, कोर्ट परिसर अशा गर्दीच्या परिसरातून हे चोरटे दुचाकी लंपास करायचे.

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ -: वैजापूर शहरातील मंगल कार्यालयांच्या परिसरातून दुचाकी चोरणारे सराईत चोरटे 12 तासांत जेरबंद करण्यात आले. या कारवाईत 7,65,000/- रुपये किंमतीच्या चोरीच्या 14 मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या. वैजापूर परिसरातील साई लॉन्स, सुभद्रा लॉन्स, द्रौपती लॉन्स, पंचायत समिती, धुमाळ मंगल कार्यालय, कोर्ट परिसर अशा गर्दीच्या परिसरातून हे चोरटे दुचाकी लंपास करायचे.

अजिंक्य ऊर्फ लाल्या अनिल बोडखे (वय 19 वर्षे रा. कारखाना बोरसर, ता. वैजापूर), दीपक काकासाहेव जगताप (वय 35 वर्षे रा. शिवराई रोड, वैजापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाणे वैजापूर येथे फिर्यादी विजय बाबुलाल त्रिभुवन व संदीप वैजीनाथ जगधने (दोघे रा. वैजापूर) यांनी तक्रार दिली होती की, दिनांक 12/4/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांची रॉयल इन्फील्ड क्लासिक बुलेट क्रमांक एम.एच. 15 एफ सी. 0636 ही वैष्णव लॉन्स लासूर रोड, वैजापूर येथून तर जगधने यांची बजाज प्लाटीना मोटरसायकल क्रमांक एमएच 20 एफई 9202 ही कोर्ट परिसराच्या आवारातून चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत भांदवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकाच वेळी वैजापूर शहरातून दोन मोटरसायकल चोरी गेल्यामुळे तसेच शहरातील मंगलकार्यालय तसेच लॉन्स व इतर शासकिय कार्यालयाचे समोरून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने वाहन चोरीच्या गुन्हयांचा जलद गतीने छडा लावण्याचे अनुषंगाने मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी वैजापूर पोलिसांसह सदर गुन्हयांचा समांतर तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांना निर्देश दिले होते.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाहनचोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपीबाबत गोपनीय माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांना लग्न सराईत लॉन्स व मंगल कार्यालयांच्या परिसरातून दुचाकी चोरी करणा-या अजिंक्य बोडखे (रा. कारखाना बोरसर, वैजापूर) याच्या बाबत माहिती मिळाली होती.

यावरून पथकाने त्याचा कसोशिने शोध सुरू केला असता तो तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वैजापूरकडून लासूर स्टेशनकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच लासूर स्टेशनच्या दिशेन धाव घेवून संशयित अजिंक्य बोडखे याचा पाठलाग सुरू केला. त्यास लासूर गाव परिसरातील टोलनाक्याच्या अलिकडे ताब्यात घेतले. तसेच त्याला विश्वासात घेवून कसोशिने विचारपुस करता त्याने पोलिसांना सांगितले की, त्यांनेच वैजापूर येथील दोन्ही दुचाकीची चोरी केली आहे. तसेच चोरी केलेल्या दुचाकी या त्याचा साथिदार दीपक जगताप याच्या मदतीने अत्यंत कमी भावात विक्री करतो असे सांगितले.

आरोपी अजिंक्य बोडखे यांने वैजापूर परिसरातील साई लॉन्स, सुभद्रा लॉन्स, द्रौपती लॉन्स, पंचायत समिती, धुमाळ मंगल कार्यालय, कोर्ट परिसर अशा गर्दीच्या परिसरातून याचप्रमाणे शिर्डी व येवला परिसरातून सुध्दा दुचाकी वाहनाची चोरी केली असून ही सर्व वाहने त्याने त्याच्या कारखाना चौफुली, बोरसर परिसरातील शेतामधील पत्राच्या चाळीमध्ये लपवून ठेवले असल्याचे सांगितले.

यावरुन पथकाने लागलीच त्याचा साथीदार दीपक काकासाहेब जगताप याला वैजापूर शहरातून शिताफिने ताब्यात घेवून त्यांनी शेतात लपवून ठेवलेली दुचाकी वाहने यामध्ये अ) होंडा युनिकॉन (01) व) वजाज पल्सर (01) क) होंडा शाईन (04 नग) ड) बजाज प्लाटिना (02 नग) इ) हिरो एचएफ डिलक्स (01) ई) हिरो स्पलेंडर (03 नग) फ) बजाज सिटी 100 (01 नग) ग) रॉयल इन्फिल्ड बुलेट (01 नग) अशा एकूण 14 दुचाकी 7,65,000/- रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या.

या गुन्हयांचा छडा हा गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत लावून सराईत दुचाकी चोरटे 1) अजिंक्य ऊर्फ लाल्या अनिल बोडखे (वय 19 वर्षे रा. कारखाना बोरसर, ता. वैजापूर), 2) दीपक काकासाहेव जगताप (वय 35 वर्षे रा. शिवराई रोड, वैजापूर) यांना चोरीच्या दुचकीसह अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने पुढील तपास वैजापूर पोलिस करीत आहेत.

ही कामगीरी मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ, पो.उप.नि भगतसिंग दुलत, नामदेव सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!