क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

जालन्याचे दोन पोलिस लाचखोरीच्या सापळ्यात अडकले ! गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व वाळूचा टिप्पर चालू देण्यासाठी एजंटला १५ हजार घेताना रंगेहात पकडले !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १ – जालना जिल्ह्यातील दोन पोलिस लाचखोरीच्या ट्रपमध्ये अडकले. दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व वाळूचा टिप्पर चालू देण्यासाठी एजंटला १५ हजार घेताना रंगेहात पकडण्यात आले. ३० हजारांची मागणी करून १५ हजारांवर तडजोड झाली आणि तडजोडीची रक्कम स्वीकारताना एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलगद पकडले.

1. पो.हे.कॉ. गजानन अंबादास नागरे बक्कल नंबर 603 नेमणूक पोलिस स्टेशन सेवली ता.जि. जालना, 2. पो.शि. प्रल्हाद ज्ञानेश्वर भानुसे वय 33 वर्ष बक्कल.नंबर 447 नेमणूक सेवली पोलिस स्टेशन ता.जि. जालना, 3. प्रदीप उर्फ वामन भगवान खंदारे वय – 32 व्यावसाय वाहन चालक रा. किर्ला ता.मंठा जि. जालना अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 23.01.2024 रोजी आरोपी क्र. 2 भानुसे यांनी तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा टिपर पकडून सेवली पोलिस स्टेशन येथे अप.क्र. 04/2024 कलम 379, 186, 279, 34 IPC सह कलम 3 व 4 खान अधिनियम 1952 प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे क्र. 1 पोहेकॉ गजानन नागले यांच्याकडे देण्यात आला होता.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

दिनांक 25.01.2024 रोजी आलोसे क्र. 1 पोहेकॉ गजानन नागरे यांनी तक्रारदार यांच्या भावास गुन्ह्यात जामीन दिल्यानंतर आलोसे क्र 2 पोशि प्रल्लाद भानुसे यास तक्रारदार यांचेकडे लाचेची रक्कम मागण्यासाठी करुन टाका , करुन टाका काही हे नाही जामीन दिली त्यायला तेच परवडतय कशाला टेंशन घ्यायच असे म्हणून प्रोत्साहन दिले.

आलोसे क्र 2 पोशि प्रल्हाद भानुसे यांनी तक्रारदार यांचेकडून दाखल गुन्हयात जामीन देवून गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी, वाळुचा टिपर चालु देण्यासाठी 30,000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 15,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम आरोपी खाजगी व्यक्ती प्रदीप उर्फ वामन खंदारे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यावरून दिनांक 31.01.2024 रोजी आरोपी क्र. 3 प्रदीप उर्फ वामन भगवान खंदारे यास तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 15000/- रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेकडुन लाचेची रक्कम 15000 /- रु जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींवर पोस्टे सेवली जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अशी करण्यात आली लाचमागणी पडताळणी- दि. 25.01.2024 रोजी आलोसे क्रं 1 पोहेकॉ गजानन नागरे यांनी आलोसे क्र. 2 पोशि प्रल्हाद भानुसे यास लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिल्याने आलोसे क्र. 2 पोशि प्रल्हाद भानुसे यांनी तक्रारदार यास सेवली पोलिस स्टेशन येथे 30000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 15000 रुपये लाचेची रक्कम आरोपी क्र. 3 खाजगी व्यक्ती खंदारे याच्याकडे देण्यास सांगितले.

ही कारवाई संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर, अपर पोलीस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व तपास अधिकारी शंकर म.मुटेकर, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो ,जालना, पर्यवेक्षण अधिकारी किरण एम बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो ,जालना, सापळापथक सहा.फौ. जुंबड, पो.अं. गजानन कांबळे, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, गणेश बुजाडे, गजानन खरात, संदीपान लहाणे, अतिश तिडके, भालचंद्र बिनोरकर यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!