क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

रिलेशनमध्ये राहण्यासाठी धमकावले ! लग्न झाल्याचे माहित होताच प्रेमसंबंध तोडले, पैठण तालुक्यातील आरोपीवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २५ – सुरुवातीला प्रेमसंबंध होते. नंतर आरोपीचे लग्न झाले असल्याची माहिती मिळताच पीडित महिलेने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. त्यानंतर आरोपीने रिलेशनमध्ये राहण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.

यातील फिर्यादी महिला व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी महिला व आरोपीचे प्रेमसंबंध होते. परंतु फिर्यादी महिलेस आरोपीचे लग्र झाले असल्याचे माहित झाल्याने फिर्यादी महिलेने आरोपीशी संबंध तोडले होते. परंतु दि. 14/4/2024 पासून आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीला रिलेशनमध्ये राहण्यासाठी धमकी देत असल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन संपत चव्हाण (रा. पोरगाव तांडा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर 257/2024 कलम 354 (ड), 506 नुसार सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिंगणे करत आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!