क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

जालना, बदनापूरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट ! जालन्यात व्यापाऱ्याचे घर फोडले तर बदनापूरला तीन ठिकाणी चोरी !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ – जालना आणि बदनापूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत चोरी केली. जालन्यात व्यापार्याच्या घरात अडीच लाखांचे दागिने लंपास केले. बदनापूरमध्ये तब्बल तीन ठिकाणी चोरी झाली तर एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. बदनापूर येथे एका घरातून चोरट्यांनी 2,20000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

रितेश जयंतलाल शाह (रा. नवपुते गल्ली मोदीखाना जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांचे सराफा बाजार येथे रेणुका स्टील नावाचे भांड्याचे दुकान आहे. दि. 10.04.2024 रोजी रात्री रितेश शाह दोन्ही मुले व पत्नी यांचेसह पुणे येथे मुलांचे अँडमिशनसाठी त्यांना सोडण्यासाठी गेले होते.

पुणे येथे मुलांसोबत असतांना दि. 14.04.2024 रात्री 03.00 वाजेच्या सुमारास त्यांचे जालन्यातील शेजारी यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या घराचे दार उघडे असून घरातून दोन अनोळखी पळाले आहे. अशी माहिती मिळाल्याने रितेश शहा पत्नी मुलांसह जालना येथील राहते घरी पोहोचले. घराच्या दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले. घरातील वस्तू अस्ता व्यस्त पडलेल्या होत्या.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कमही दिसून आली नाही. एकूण 2,56,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी रितेश शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरू एसबी जालना पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

बदनापूरमध्ये तीन ठिकाणी चोरी, एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न

गोकुळ उध्दव सोनवणे (रा. विरसावरकरनगर, बदनापूर ता. बदनापुर जि, जलाना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 13.04.2024 रोजी सोनवणे सकाळ पासून MSEB कार्यालय बदनापुर येथे ड्युटी होते व दुपारी मुलाला छञपत्ती संभाजीनगर येथे दवाखाना करुन घरी आले. रात्री 12.00 वाजेपर्यत गप्पा गोष्टी करून दरवाजे लावून झोपी गेले.

दिनांक 14.04.2024 रोजी रात्री 03.30 वाजेच्या सुमारास सोनवणे यांना जाग आली तेव्हा शेजारी घरी आले व म्हणाले तुमचे दार उघडे आहे. तेव्हा घराची पाहणी केली असता घराच्या पाठीमागील दाराची आतील कडी तुटलेली दिसली. कपाट उघडे होते. व त्यातील कपडे खाली जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने दिसले नाही.

एकूण 2,20000/ रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच सोनवणे यांचे शेजारी राहणारे संदीप यशवंतराव साळवे यांचे पण सोन्या चांदीचे दागिने रात्री चोरी झाल्याचे समजले आहे. तसेच सुभाष नारायण पांढरे रा. एकतानगर बदनापूर यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला असून अक्षय रविद्र राऊत रा. बदनापूर यांचे ऑफिसमध्ये चोरी झाल्याचे समजल्याची माहिती सोनवणे यांनी पोलिसांत दिली.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!