शहगंज येथील खाली बस डेपोवर साचत असलेल्या कचऱ्याबाबत मनपाच्या पत्रानंतर परिवहन महामंडळाला जाग !
१५ वर्ष जुन्या कचऱ्याची समस्येचा समाधान
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहगंज येथील जुन्या बस डेपोवर साचत असलेल्या कचराबाबत कार्यवाई नंतर आता तिथे राज्य परिवहन महामंडळाकडून पत्रे लावून खाली जागा संरक्षित करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहरातील खुल्या जागा जिथे कचरा पडत असल्यामुळे ढीग तयार होतात अश्या जगासाठी सुक्ष्म नियोजन करुन कचऱ्याचे निर्मूलन करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यानुसार मनपा उपायुक्त रवींद्र जोगदंड यांना शहगंज येथील ओसाड पडलेल्या जुन्या राज्य परिवहन महामंडळाच्या डेपोच्या जागेवर प्रचंडप्रमाणे कचरा जमा होत असल्याचे कळले. त्यानी घनकचरा व्यवस्थापन विभागातील टीम सोबत जागेची पाहणी केली. मशिन लावून जागेवर पडलेला कचरा पूर्णपणे साफ करण्यात आला.
यानंतर राज्य परिवहन महामंडळाला त्या जागेवर कचरा पडू नये ही खात्री करण्यासाठी पत्र ही दिले. त्याचावर कार्य करून आता राज्य महामंडळाने संबंधित खुल्या जागेच्या भोवती पात्र लावून संरक्षित केले आहे. यामुळे आता १५ वर्ष जुनी कचऱ्याची समस्येचा समाधान झाला आहे.
यामध्ये घनकचरा विभागातले परिविक्षाधीन अधिकारी दीपक भरड, अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र घडामोडे, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, नियंत्रण अधिकारी धीरज चव्हाण, शहर समन्वयक किरण जाधव व चेतन वाघ स्थानिक झोन २ स्वच्छता कर्मचारी यांनी मेहनत घेतली.