क्राईममराठवाडा

तहसीलदारच्या गाडीवरील चालक लाच घेताना पकडला, वाळूचा ८ हजारांचा हप्ता स्वीकारताना सापळ्यात अलगद अडकला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – वाळु वाहतूक करु देण्यासाठी व वाळुच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी ८ हजारांची लाच घेताना कळंब तहसिलदारांच्या वाहन चालकास पकडण्यात आले. कळंब पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अनिल शिवराम सुरवसे (वय 54 वर्षे, वाहन चालक, वर्ग -3, तहसिलदार कार्यालय, कळंब, जि. धाराशीव, रा.ठि. झिंगाडे प्लॅाटींग, अंबाबाई मंदिराचे बाजुला, लोहारा, धाराशीव) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळु वाहतुक करतात. यातील आरोपी अनिल सुरवसे हे तहसिलदार कळंब यांच्या वाहनावर वाहन चालक असून त्यांनी तक्रारदार यांना वाळु वाहतुक करु देण्यासाठी व वाळुच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी दि. 19/12/2023 रोजी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणुन 15,000/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 8000/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली व आज दि. 20/12/2023 रोजी 8000/- रु लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यास ताब्यात घेतले. पोलिस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!