क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

देवगाव रंगारीच्या शेतकऱ्याकडून लाच घेताना गंगापूर तालुक्यातील तलाठी रंगेहात पकडला ! RBL बॅंकेच्या कर्जाचा बोजा चढवण्यासाठी घेतली लाच !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ – कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील एका शेतकऱ्याकडून लाच घेताना गंगापूर तालुक्यातील तलाठी रंगेहात पकडला. RBL बॅंकेच्या कर्जाचा बोजा चढवण्यासाठी लाच घेताना तलाठ्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

विनोद भाऊराव साळवे (वय 44 वर्ष पद तलाठी (वर्ग तीन) सजा- शिंदी सिरसगाव,तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांची माळीवाडगाव तालुका गंगापूर या ठिकाणी गट नंबर 62 येथे एक हेक्टर 44 आर शेतजमीन आहे. शेती विकासाची कामे करण्यासाठी त्यांनी आरबीएल बँक संभाजीनगर येथून बारा लाख 74 हजार 855 रुपयांचे कर्ज मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे.

कर्ज मंजूर होण्याकरिता तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचा बोजा चढविण्याकरिता व महाराष्ट्र महसूल अधिनियम महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 नमुना 9 ची नोटीस काढण्याकरिता आरोपी तलाठी विनोद साळवे यांनी दोन हजार रुपयांची मागणी करून एक हजार रुपये लाच मागणीच्या वेळी पंचा समक्ष घेतले व नोटीस प्रकाशित केल्यानंतर दिनांक 22-2 -2024 रोजी उर्वरित एक हजार रुपयाची लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले. दौलताबाद पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,  मुकुंद अघाव, अपर पोलिस अधीक्षक, राजीव तळेकर पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- दिलीप महादेव साबळे, पोलीस उपअधिक्षक, सापळा पथक – पोलीस हवालदार जीवडे, पाटील ,पाठक, चालक पोलीस अंमलदार शिंदे, बागुल यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!