ताज्या बातम्यामराठवाडा

गंगापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न ! शिवरस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर पेट्रोल ओतून घेतले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- शिवरस्त्याच्या मागणी अर्जावर कोणतीही कार्यवाही न केल्यावरून गंगापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर १७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पेट्रोलसारखे द्रव्य अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

शंकर पुंजाराम औताडे (वय ३९, रा. आगाखान, ता. गंगापूर. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस स्टेशनचे रविकिरण शामलाल गोलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आत्मदहनार्थी शंकर पुजाराम औताडे (वय – 39 वर्ष, धंदा – शेती रा. आगाखान ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी शेतात जाणारा शिवरस्ता चालू करून द्या अशा मागणीचा तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर छत्रपती संभाजीनगर येथे अंगावर पेट्रोल सारखे द्रव्य अंगावर ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!