क्राईमताज्या बातम्यामराठवाडा
Trending

उपजिल्हाधिकारी व सेवानिवृत्त मंडळ अधिकारी लाचेच्या जाळ्यात ! जायकवाडी प्रकल्पाच्या भूसंपादन कार्यालयात घेतली लाच !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ – सात्रा पोत्रा तलावाच्या बुडीत क्षेत्रात संपादित झालेल्या घराचा मावेजा देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना सेवानिवृत्त मंडळ अधिकार्यास रंगेहात पकडण्यात आले. बीडच्या उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्यासाठी या सेवा निवृत्त मंडळ अधिकार्याने लाच घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

1. भारती अण्णासाहेब सागरे, वय 47 वर्षे उपजिल्हाधिकारी (वर्ग १) भूसंपादन अधिकारी, जायकवाडी प्रकल्प,बीड, 2. नवनाथ प्रभाकर सरवदे, वय 60 वर्षे, सेवा निवृत्त मंडळ अधिकारी (खाजगी ईसम) फुले नगर धानोरा रोड बीड. अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांचे आजोबा यांचे घर सात्रा पोत्रा तलावाच्या बुडीत क्षेत्रात संपादित झाले आहे . त्याचा मावेजा शासनाकडून दि . 9/8/2021 रोजी 5,38,965 रुपये उप जिल्हाधीकारी भूसंपादन कार्यालय , जायकवाडी प्रकल्प बीड यांच्याकडे जमा झाला. तक्रारदार यांचे आजोबांचे वारसांना मावेजा मिळण्यासाठी संबधीत कार्यालयास सर्व कागदपत्रांची पुर्तता करून देखील मावेजा मिळण्यास विलंब होत असल्याने तक्रारदार यांनी यातील आलोसे श्रीमती भारती सागरे यांची दि 23/01/2024 रोजी भेट घेतली असता त्यांनी निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ सरवदे यांची भेट घेऊन त्यांचेशी बोलणी करण्याचे सांगीतले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यावरुन तक्रारदार त्यांनी निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ सरोदे यांची भेट घेतली असता त्यांनी भारती सागरे यांच्या वतीने 10000 रुपयांची लाच मागणी केली व तडजोडअंती 5000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांनी पुन्हा लोकसेवक भारती सागरे यांची भेट घेतली असता त्यांनी निवृत्त मंडळ अधिकारी सरवदे यांच्या लाच मागणीला दुजोरा दिला.

त्यानंतर सापळा कारवाईचे आयोजन भूसंपादन कार्यालय बीड येथे केले असता तक्रारदार यांचेकडून निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ सरवदे यांनी पंचा समक्ष लाच रक्कम 5000 स्वीकारताच त्यास रंगेहात पकडण्यात आले. आलोसे श्रीमती भारती सागरे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस स्टेशन शिवाजी नगर , बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!