छत्रपती संभाजीनगर, दि. २० -: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील मंदिरात चोरी झाली असून चोरटा CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे. संबंधीत संशयिताची पोलिस चौकशी करत आहे.
श्रीकांत लक्ष्मण दसरे (रा. बालाजी गल्ली अजिंठा ता. सिल्लोड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांच्या घरासमोर शिवमारोती मंदिर संस्थान अजिंठा आहे. त्या मंदिर संस्थानवर दसरे सचिव म्हणून काम पाहतात. शिवमारोती मंदिर दिवसा उघडे असते आणि रात्री मंदिराच्या दरवाजाला कडी लावण्यात येते.
दि. 19/01/2024 रोजी सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास दसरे हे नेहमी प्रमाणे दर्शनासाठी शिवमारोती मंदिरात गेले. तेंव्हा त्यांना समजले की, मंदिरातील दान पेटीची कडी व कोंडा तुटलेला आहे. त्यामुळे मंदिरात हजर असलेल्या भाविकांनी सदर पेटीची पाहणी केली तेंव्हा समजले की, दानपेटीतील पैशांची चोरी झालेली आहे. मंदिरातील CCTV फुटेज चेक केले असता रात्री 01.57 वाजेच्या सुमारास एका जणाने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील दानपेटीतील कडी कोंडा तोडून दानपेटीतील पैसे चोरी करताना दिसून आला. याप्रकरणी CCTV फुटेजमध्ये दिसणार्या व्यक्तीची पोलिस चौकशी करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याप्रकरणी श्रीकांत लक्ष्मण दसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.