रिक्षाच्या नंबरवरून राडा : ज्यादा मस्ती में आ गए म्हणत रिक्षातून हत्यार काढून डोक्यात मारले !
छत्रपती संभाजीनगर, दि. २६- रिक्षा लावण्यावरून राडा झाला. ज्यादा मस्ती में आ गए म्हणत रिक्षातून हत्यार काढून एकाने दुसर्याच्या डोक्यात मारले. छातीत दगड व खांद्याजवळ लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची फिर्याद सातारा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.
ही घटना दि. २५ मे रोजी ११ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील रेणुका माता कमानीच्या रिक्षा स्टॅंडजवळ छत्रपती संभाजीनगर येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यातील फिर्यादीस कय्युम पटेल याने रिक्षा लावण्यावरून वाद घातला. फिर्यादीस आई बहीणीवरून व जातीवरून शिवीगाळ केली. फिर्यादी त्याला समजावून सांगत असताना ज्यादा मस्ती में आ गए, असे म्हणत काही न पाहता त्याच्या रिक्षातील हत्यार काढून फिर्यादीच्या डोक्यात मारले. बेदम मारले. तसेच छातीत दगड मारले व खांद्याजवळ लोखंडी टॉमीने मारले. तसेच पोलीस स्टेशनला आल्यानंतर अश्पाक पटेल यांनी तुम पोलीस कंम्पलेन्ट करेंगे तो तुम्हे जान से मार देंगे. अशी धमकी दिली असल्याची फिर्याद जखमीने दिली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याप्रकरणी कय्युम पटेल, अश्पाक पटेल (रा. देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर सादारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धनजय पाटील सहा. पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग यांच्याकडे दिला आहे.