तलवार घेवून आला व गरागरा फिरवू लागला, लोकांनी घराचे दरवाजे बंद केले ! घरासमोरून जाण्यावरून वाद, गुन्हा दाखल !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : घरासमोरून जाण्याच्या वादातून एक जण तलवार घेवून आला व गरागरा फिरवू लागल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना सिल्कमिल्क कॉलनी, बीड बायपास छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.
अल्तमश खान याहिया खान (रा. सिल्कमिल कॉलनी, बीड बायपास छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 26/01/2024 रोजी 20.00 वाजता अल्तमश खान याहिया खान हे त्यांच्या घरासमोर बसलेले असताना सय्यद अकिल सय्यद काजिम हा घरासमोरून जाताना म्हणाले की, तु हमारे घर के सामने से जाने का नही.
यावर अल्तमश खान याहिया खान हे त्यास म्हणाले की, ये रस्ता सबका आने जाने का है तुम कौन हमारे को अडानेवाले ? यावर ते म्हणाले की, तेरे को अभी बताता असे म्हणुन अकिलने त्याच्या घरात जावून तलवार घेवून आला व हातात घेवून फिरवू लागला. यामुळे गल्लीतील लोक घाबरून त्यांनी घराचे दरवाजे बंद केले. नंतर धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याप्रकरणी अल्तमश खान याहिया खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून सय्यद अकील सय्यद काजिम (रा. सिल्कमिल्क कॉलनी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ वैष्णव हे करीत आहेत.