ताज्या बातम्यामराठवाडा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी ! मोर्चा, सभा व मिरवणुकीस मनाई !!

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि.३१ जानेवारी पर्यंत अंमलात असतील.

या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विना परवानगी पाच पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना असतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!