छत्रपती संभाजीनगर : वीजबिल वसुलीस गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने हा प्रकार घडला.
महावितरणच्या नक्षत्रवाडी शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पाटील हे मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास नक्षत्रवाडीतील ग्राहक विजय पाठे याचे बिल थकीत असल्याने त्यांचे बिल वसुलीसाठी गेले होते. बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला. त्यावरून विजय पाठेच्या भावाने पाटील यांना शिवीगाळ करून शासकीय कामाकाजात अडथळा आणला. पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe