उद्धव ठाकरेंना मोठा झटका, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची ! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ऐतिहासीक फैसला !!
मुंबई, दि. १० – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा ऐतिहासिक फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील शिवसेना पक्षाच्या घटनेला ग्राह्य धरून हा निकाल देण्यात आला. शिवसेना कुणाची हा निर्णय बहुमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे मुळ पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या गटाची असल्याचं या निकालाने शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
घटनेच्या १० सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्वच बघायचं होतं, पक्षाचा प्रमुख कोण एवढंच मला ठरवायचं होतं, असंही विधानसभा अध्यक्षांनी निकालपत्र वाचन करताना म्हटलं आहे. खरी शिवसेना ठरवण्याचा अधिकार हा मलाच आहे असे म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तावर शिक्कामोर्तब करून खरी शिवसेनाही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा ऐतिहासिक फैसला दिला. या फैसल्यामुळे उद्धव ठाकरे गटाना मोठा झटका बसला आहे. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेवू शकत नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम राहील, असंही या निकालात नमूद करण्यात आलं आहे. पक्षप्रमुख यांचा निर्णय अंतिम राहील हा उद्धव ठाकरे यांचा दावा याचिकेत फेटाळण्यात आला आहे.
आज, १० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर एकत्रित फैसला सुनावताना ठळक मुद्द्यांच वाचन केलं. आज सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचं वाचन केलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांच्या एकत्रित याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी हा ऐतिहासिक फैसला दिला. खरी शिवसेना कोणती यावर आधी निर्णय देण्यात आला. त्यानंतर अपात्रतेच्या याचिकेवरील निकालाचे वाचन करण्यात आले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
खरी शिवसेना कोणाची यावर दिलेल्या निकालपत्राचे वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेची घटना, १० व्या सुचीचे निकष यावर विश्लेषण केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचाही आधार त्यांनी घेतला. विधीमंडळातील बहुमत हा मुद्दा देखील विचारात घेतला. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेनेच्या वेगवेगळ्या घटना दाखल केल्या होत्या. दोन्ही गटांच्या दाव्यावरून पक्षप्रमुखांच्या नावावरून मतमतांतरे होती. उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या पक्षाच्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता. २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत जी दुरुस्ती केली ते चुकीचं असल्याचे स्पष्ट मत विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. ठाकरे गटाने केलेली पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही घटनाबाह्य आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडील उपलब्ध असलेली शिवसेना पक्षाची घटना ग्राह्य धरण्यात आली. घटना, विधीमंडळ आणि नेतृत्व हे तीन मुख्य घटकांवर विश्लेषण करण्यात आले. घटनेच्या १० सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्वच बघायचं आहे, पक्षाचा प्रमुख कोण एवढंच मला ठरवायचं आहे, असंही विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.
२१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. खरी शिवसेना कोणती हे शिवसेनेच्या घटनेवरूनच ठरवण्यात आलं आहे. नेते आणि पदाची रचना यावरूनच शिवसेना कोणाची हे ठरण्यात आलं आहे. २०१८ मध्ये शिवसेनेची अंतर्गत निवडणूक झालेली नसल्याने त्यावर्षी केलेली पक्षाची घटनादुरुस्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय २०१८ मधील पदरचना ही पक्षाच्या घटनेनुसार नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडील शिवसेना पक्षाची घटना वैध मानन्यात आली. शिवसेनेची १९९९ ची घटना मान्य करण्यात आली असून त्यावर आधारीत हा फैसला देण्यात आला. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम राहील, असंही या निकालात नमूद करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता. याशिवाय पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार दिल्यास ते लोकशाहीला घातक ठरेल. त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकटेच निर्णय घेवू शकत नाही किंवा कुणालाही पदावरून काढू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पदावरून काढून टाकणे हे मान्य नाही. कार्यकारिणीशी चर्चा करूनच एखाद्याला पदावरून काढून टाकता येते. नवा नेता निवडला असेल तर तो मान्य करावा लागेल, असंही निकालात नमूद करण्यात आलं आहे.