सुंदरवाडी शिवारातील हॉटेल गॅलेक्सीमधील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड ! पाच महिलांची सुटका, गंगापूर तालुक्यातील दोघांवर गुन्हा !!
छत्रपती संभाजीनगर, दि. ६- हॉटेल गॅलेक्सीमध्ये छुप्या मार्गाने चालणा-या कुंटनखान्यावर पोलिसांनी धाड टाकून 5 आंतरराज्यीय पीडितांची सुटका करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभागाने ही धडाकेबाज कारवाई केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीतील सुंदरवाडी शिवारातील हॉटेल गॅलेक्सी या ठिकाणी हॉटेल मालक व मॅनेजर हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 5 आंतरराज्य राहणा-या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत आहे.
मिळालेल्या या माहितीच्या अनुषंगाने मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा नागरे, उपविभागीय पोलीस अधिकारी व सपोनि आरती जाधव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक (AHTU) यांच्या पथकांने दिनांक 05/02/2024 रोजी हॉटेल गॅलेक्सी परिसरात सापळा लावला. एका डमी ग्राहकांस हॉटेल गॅलेक्सीत पाठवले असता तेथे हॉटेल मालक संदीप खाजेकर याला डमी ग्राहक भेटला असता त्यांने तुम्हाला जे पाहिज ते मॅनेजर भावेश जाधव हे देतील असे सांगून तेथील नौकर जब्बार शेख याला डमी ग्राहक याची भेट हॉटेल मॅनेजर जाधव यांचेशी घालून देण्याचे सांगितले. यावरून डमी ग्राहक हा हॉटेल मॅनजेर भावेश जाधव याला भेटला असता मॅनेजर याने ग्राहकाला तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल त्या करिता तुम्ही हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरिल रूम नं १०१ जा असे सांगितले. यावरुन तेथे अवैधरित्या वेश्याव्यवसाय करून घेताला जातो आहे. याबाबत पथकांची खात्री झाल्याने पथकाने डमी ग्राहकांस रूममध्ये गेलावर इशारा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
यावरून डमी ग्राहक हा हॉटेल गॅलेक्सीच्या पहिल्या मजल्यावरिल रूम नं 101 मध्ये जावून थांबला असता तेथे मॅनेजर हा एक महिलेला घेवून आला असता डमी ग्राहकांने लपून बसलेल्या पथकाला इशारा करताच पथकांने छापा मारून पीडित महिलेची सुटका केली. याचप्रमाणे हॉटेलच्या इतर खोल्याची झडती घेतली असता तेथील इतर खोल्यात लपवून ठेवलेल्या 4 आंतरराज्यीय महिला मिळून आल्याने चौकशी केली असता यामध्ये पटना (बिहार) येथील 1 पीडिता, सुरत व अहमदाबाद (गुजरात) येथील २ पीडिता तसेच पश्चिम बंगाल येथील 2 पीडित महिला यांच्याकडून अवैधरित्या देहव्यापार करून घेतला जात होता. यावेळी पथकाने 5 आंतरराज्य राहणा-या महिलांची सुटका केली.
तसेच आरोपी १) संदीप भिकाजी खाजेकर वय २६ वर्षे, हॉटेल मालक रा. सिध्दनाथ वडगाव ता. गंगापूर ह.मु. हॉटेल गॅलेक्सी, संदरवाडी शिवार, छत्रपती संभाजीनगर २) भावेष प्रविण जाधव वय २० वर्षे हॉटेल मॅनेजर रा. रामनगर, हर्सूल टि पाँईट छत्रपती संभाजीनगर ३) जब्बार निजाम शेख वय २६ वर्षे वेटर, रा. शिंगी ता. गंगापूर छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुध्द कलम 3,4,5, अनैतिक देह व्यापार अधिनियम १९७६ प्रमाणे पोस्टे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मोबाईल फोनसह एकूण 78,760/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा नागरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, आरती जाधव, सपोनि, पोलीस अंमलदार कपिल बनकर, मंजुषा हातकंगणे, सपना चरवंडे, इर्शाद पठाण यांनी पार पाडली.